Nashik Kelune Double Murder Caseसुरगाणा तालुक्यातील केळुणे येथे वयोवृद्ध दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ; नातू-नातसून चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात.

Nashik Kelune Double Murder Case

सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत केळुणे येथे वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृतांची नावे सखाराम गावित (६६) आणि बायजाबाई सखाराम गावित (६३) अशी आहेत. दोघेही रात्री घरात झोपले असताना त्यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनेची माहिती सकाळी मिळताच पोलीस पाटील बापूराव भोये यांनी सुरगाणा पोलिसांना याबाबत कळविले. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी करून तपासासाठी महत्त्वाचे पुरावे संकलित केले. _ Nashik Kelune Double Murder Case

दरम्यान, पोलिसांनी मृत दाम्पत्याचा नातू देविदास रघुनाथ गावित आणि नातसून वनिता देविदास गावित यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत दोघांनी हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, मृत दाम्पत्याकडून दररोज मद्यपान करून शिवीगाळ व कटकट केली जात असल्याने संतापाच्या भरात ही हत्या केल्याचे दोघांनी चौकशीत सांगितल्याचे समजते. मात्र, हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे. _ Nashik Kelune Double Murder Case

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक एम. विमला, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि सुरगाणा पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

प्रतिनिधी : लक्ष्मण बागुल _ Nashik Kelune Double Murder Case

Chandwad Taluka Level School Volleyball Competition : चांदवड तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न; 22 शाळांचा सहभाग

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Nashik Kelune Double Murder Case : केळुणे येथे वयोवृद्ध दाम्पत्याची कुऱ्हाडीने हत्या; नातू-नातसून पोलिसांच्या ताब्यात”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed