Nashik Pandhurli Samruddhi Mahamarg Connector
नाशिक शहराला समृद्धी महामार्गाशी अधिक जवळून जोडण्यासाठी पांढुर्ली येथे सुमारे 28 किलोमीटरचा नवा कनेक्टर उभारण्याच्या प्रस्तावाला वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी दिल्याचे वृत्त असून, सुमारे 300 कोटी रुपयांचा हा प्रकल्प प्रस्तावित आहे. सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर या कनेक्टरचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या नाशिक शहरातून समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी नागरिकांना मोठा वळसा घ्यावा लागतो. नाशिककरांसाठी इगतपुरी इंटरचेंज सुमारे 45 किलोमीटर, भरवीर खुर्द इंटरचेंज सुमारे 44 किलोमीटर, तर सिन्नर इंटरचेंज सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर किंवा समृद्धी महामार्गालगतच्या भागात जाणाऱ्या वाहनांना अतिरिक्त अंतर पार करावे लागते.
पांढुर्ली कनेक्टर अस्तित्वात आल्यानंतर नाशिक शहरातून समृद्धी महामार्गापर्यंतचे अंतर सुमारे 28 किलोमीटरपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी होण्यासोबतच नाशिक शहराची समृद्धी महामार्गाशी थेट आणि अधिक सोयीस्कर जोडणी होणार आहे.
सुरुवातीला दोनपदरी, पुढे चारपदरी मार्ग _ Nashik Pandhurli Samruddhi Mahamarg Connector
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात कमी भूसंपादनात दोनपदरी कनेक्टर तयार करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर आवश्यक भूसंपादन करून या मार्गाचा विस्तार चारपदरी करण्याची योजना असल्याचे वृत्त आहे.
यासोबतच नाशिक शहर ते पांढुर्ली या विद्यमान रस्त्याचे नूतनीकरण आणि दर्जोन्नती करण्याचेही नियोजन आहे. सध्या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार करण्याचे काम सुरू असून, पुढील प्रशासकीय मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
कुंभमेळ्याच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा _ Nashik Pandhurli Samruddhi Mahamarg Connector
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकासाचा आराखडा मंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते आणि वाहतूक कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ₹22,425.39 कोटींचा व्यापक विकास आराखडा मंजूर केला आहे.
पांढुर्ली कनेक्टरमुळे समृद्धी महामार्गावरून नाशिक शहरात येणाऱ्या आणि नाशिकहून समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी व जवळचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो. विशेषतः कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या वाहनांची गर्दी हाताळण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
मात्र, सध्या उपलब्ध माहितीनुसार प्रकल्पाची अंतिम प्रशासकीय प्रक्रिया, DPR आणि प्रत्यक्ष बांधकामाचा अधिकृत कालावधी याबाबत पुढील मंजुरीनंतरच स्पष्टता येणार आहे. _ Nashik Pandhurli Samruddhi Mahamarg Connector
नाशिक शहर आणि समृद्धी महामार्ग यांच्यातील सध्याचे 40 ते 45 किलोमीटरचे अंतर कमी करून अवघ्या 28 किलोमीटरवर आणण्याच्या या प्रस्तावामुळे नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
प्रतिनिधी : दिपक सरोदे _ Nashik Pandhurli Samruddhi Mahamarg Connector


[…] […]
[…] […]
Solid platform with a very fair system. I feel like I actually have a chance to win here compared to other sites. Check mahesa189login