Ashok Murtadak Gold Fraud Case Nashik
नाशिक | MHDU News
नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी धक्कादायक फसवणुकीची घटना समोर आली आहे. माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाची तब्बल २०० तोळे सोन्याची फसवणूक झाल्याची बाब उघडकीस आली असून, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संशयित योगेश बाळकृष्ण दाभाडे याने गेल्या काही वर्षांत मुर्तडक कुटुंबाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर जुने सोन्याचे दागिने विशेष प्रक्रियेद्वारे दुप्पट करून परत देण्याचे आमिष दाखवत घरातील महिलांना विश्वासात घेतले. या विश्वासाच्या आधारे कुटुंबातील महिलांनी टप्प्याटप्प्याने दागिने त्याच्या ताब्यात दिल्याचे समोर आले आहे.
तक्रारीनुसार, माजी महापौरांच्या पत्नीकडील १०० तोळे, मुलीकडील ५० तोळे आणि सुनेकडील ५० तोळे, असे एकूण २०० तोळे (सुमारे २ किलो) सोन्याचे दागिने संशयिताने स्वीकारले. मात्र, दागिने परत करण्याऐवजी तो दीर्घकाळ विविध कारणे देत टाळाटाळ करत राहिला.
अखेर संशय निर्माण झाल्यानंतर ही बाब अशोक मुर्तडक यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
या प्रकरणातील सोन्याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार कोट्यवधी रुपयांपर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरातील एका प्रतिष्ठित कुटुंबालाच अशा प्रकारे फसवणुकीला सामोरे जावे लागल्याने नाशिकमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
Ashok Murtadak Gold Fraud Case Nashik
डाक विभागाची २४ जुलैला पेन्शन अदालत; अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २० जुलै


[5729]qqee login করুন | বিকাশ দিয়ে অনলাইন স্লট গেম খেলুন,qqee app download করে লাইভ ক্যাসিনো বোনাস অফার উপভোগ করুন। বিকাশ দিয়ে ক্যাসিনো ডিপোজিট করে আজই অনলাইন স্লট গেম খেলার নিয়ম জানুন ও শুরু করুন। visit: qqee
[1183]Linebet লগইন এবং অ্যাপ ডাউনলোড | বিকাশ দিয়ে ক্যাসিনো ডিপোজিট,linebet login করুন এবং সহজেই অ্যাপ ডাউনলোড করে অনলাইন স্লট গেম খেলার নিয়ম জানুন। লাইভ ডিলার ক্যাসিনো গেমস উপভোগ করতে আজই যোগ দিন। visit: linebet