Nashik Crime Family Burning Attempt Lekhanagar
नाशिक प्रतिनिधी : दिपक सरोदे
नाशिक | १५ जुलै २०२६: नाशिक शहरातील लेखानगर परिसरातील इंदिरा गांधी वसाहतीमध्ये जुन्या वादाच्या कारणावरून एका कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराचे मुख्य दार बाहेरून बंद करून घरावर ज्वलनशील द्रव टाकत आग लावल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (१३ जुलै) पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुधाकर शंकर दांडेकर (वय ३८) हे आपल्या कुटुंबासह घरी झोपलेले असताना हा प्रकार घडला. त्यावेळी घरात त्यांची पत्नी, मुले तसेच इतर कुटुंबीय उपस्थित होते.
या प्रकरणात सूरज दांडेकर (वय १९), प्रदीप ऊर्फ भैया दांडेकर (वय २१) आणि पवन दत्ता गायकवाड (वय १८, सर्व रा. इंदिरा गांधी वसाहत, लेखानगर) यांनी जुन्या वादातून घराचे मुख्य दार बाहेरून बंद केले. त्यानंतर घरावर ज्वलनशील द्रव टाकून आग लावल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
आगीची घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांची मदत मागितली. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गिरी पुढील तपास करत आहेत.
Nashik Crime Family Burning Attempt Lekhanagar
भावली डॅम परिसरात पर्यटक कुटुंबावर हल्ला; नाशिक ग्रामीण पोलिसांची कठोर कारवाई, ९ आरोपी जेरबंद

