Nashik Simhastha Kumbh Mela Health Planसिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आरोग्य विभागाची २५४ कोटींची तयारी

Nashik Simhastha Kumbh Mela Health Plan

नाशिक, दि. २२ ऑगस्ट २०२६ : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने तयारीला वेग दिला आहे. देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याने आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी तब्बल २५४ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात आरोग्य विभागाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी डिसेंबरपर्यंत आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश देण्यात आले.

३,५०० मनुष्यबळाचे नियोजन _ Nashik Simhastha Kumbh Mela Health Plan

कुंभमेळ्याच्या कालावधीत आरोग्य विभागाला सुमारे ३,५०० मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी मनुष्यबळाचे नियोजन सुरू असून आवश्यकतेनुसार नवीन रुग्णवाहिका आणि वैद्यकीय यंत्रसामग्रीची खरेदी करण्यात येणार आहे.

नदीकाठाच्या दोन्ही बाजूंवर, साधुग्राम, वाहनतळ आणि गर्दीच्या प्रमुख ठिकाणी आरोग्य विभागाची वैद्यकीय पथके तैनात केली जाणार आहेत.

औषधसाठा आणि वैद्यकीय सुविधांवर भर _ Nashik Simhastha Kumbh Mela Health Plan

भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे आणि आपत्कालीन आरोग्य सुविधांचे आगाऊ नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रलंबित शासकीय रुग्णालयांची कामे मोहीम स्तरावर पूर्ण करून डिसेंबरपर्यंत रुग्णालये कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांनी फ्ल्यू प्रतिबंधक लसीकरण करून यावे, यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. जळीत रुग्णांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्याची सूचनाही देण्यात आली.

_ Nashik Simhastha Kumbh Mela Health Plan

कुंभमेळ्यामुळे त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील स्थानिक नागरिकांच्या नियमित आरोग्यसेवेत अडथळा निर्माण होऊ नये, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार विद्यमान इमारतीत बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवण्यासोबतच नवीन रुग्णालयासाठी पर्यायी जागेचा शोध घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

महिला रुग्णालयाचे बांधकाम, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा, किडनीविषयक उपचार, शीतकक्षाची क्षमता वाढविणे, ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणे आणि सिटी स्कॅन सुविधा कार्यान्वित करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

कुंभमेळ्याच्या पर्वणी कालावधीनंतरही आरोग्य सेवा कायम ठेवण्याची अपेक्षा लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली.

या बैठकीस खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, उपमहापौर विलास शिंदे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांच्यासह आरोग्य विभाग व कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी : दीपक सरोदे _ Nashik Simhastha Kumbh Mela Health Plan

Government Property Inquiry Local Board School Board Maharashtra : लोकल बोर्ड आणि स्कूल बोर्डाच्या जुन्या शासकीय मालमत्तांची चौकशी करा; ‘निर्मल स्वदेश ग्रुप’ची मागणी

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

4 thoughts on “Nashik Simhastha Kumbh Mela Health Plan : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य विभाग सज्ज; २५४ कोटींचा आराखडा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed