Fda Loose Edible Oil Ban Tukaram Munde Nashik Tradersसुट्या खाद्यतेल विक्रीबंदीच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील खाद्यतेल व्यापारी आक्रमक; निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्धार.

Fda Loose Edible Oil Ban Tukaram Munde Nashik Traders

नाशिक : हॉटेलमधील जेवणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कारवाई केल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नागरिकांच्या घरातील खाद्यतेलाकडेही मोर्चा वळवला आहे. आपल्या ताटातील खाद्यतेलावर थेट FDA ची नजर असणार असून, भेसळ, निकृष्ट दर्जाचे तेल आणि ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यात सुटे खाद्यतेल विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाविरोधात राज्यभरातील खाद्यतेल व्यापारी आक्रमक झाले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय नाशिकमध्ये झालेल्या खाद्यतेल व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला._ Fda Loose Edible Oil Ban Tukaram Munde Nashik Traders

हा निर्णय मागे घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी राज्य सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातील व्यापारी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

गरज पडल्यास न्यायालयीन लढाईसोबतच केंद्र सरकारकडेही पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सुटे खाद्यतेल विक्रीवरील बंदी तसेच त्यासंदर्भातील १० लाख रुपयांचा दंड आणि कारावासाची तरतूद अन्यायकारक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यतेलाला आळा घालण्याच्या उद्देशाने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असला, तरी या निर्णयामुळे राज्यातील खाद्यतेल व्यापाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि १५ दिवसांच्या अल्टिमेटमनंतर व्यापारी पुढील कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

-प्रतिनिधी : कुणाल दाणेच _ Fda Loose Edible Oil Ban Tukaram Munde Nashik Traders

Nashik Simhastha Kumbh Mela Health Plan : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य विभाग सज्ज; २५४ कोटींचा आराखडा

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Fda Loose Edible Oil Ban Tukaram Munde Nashik Traders : तुकाराम मुंढेंच्या खाद्यतेल विक्रीबंदीच्या निर्णयाविरोधात व्यापारी आक्रमक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed