Government Property Inquiry Local Board School Board Maharashtraलोकल बोर्ड आणि स्कूल बोर्डाच्या जुन्या शासकीय मालमत्तांचे विशेष सर्वेक्षण व GIS डिजिटल मॅपिंग करण्याची मागणी; ‘निर्मल स्वदेश ग्रुप’चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब रामदास इंगोले यांचा राज्यपाल व मुख्य सचिवांकडे तक्रार अर्ज.

Government Property Inquiry Local Board School Board Maharashtra

नाशिक : महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांच्या स्थापनेपूर्वी अस्तित्वात असलेल्या तत्कालीन लोकल बोर्ड आणि स्कूल बोर्डांच्या ताब्यातील शासकीय मालमत्तांची विशेष सर्वेक्षण व चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ‘निर्मल स्वदेश ग्रुप’चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब रामदास इंगोले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यपाल तसेच राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार अर्ज पाठवला आहे.

जिल्हा परिषदांची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन लोकल बोर्ड आणि स्कूल बोर्डांच्या ताब्यातील शाळांच्या इमारती, जमिनी, मोकळ्या जागा आणि इतर स्थावर-जंगम मालमत्ता जिल्हा परिषदांच्या व्यवस्थेकडे वर्ग करण्यात आल्या. मात्र, या मालमत्तांच्या हस्तांतरणानंतर संबंधित मालमत्ता नोंदवह्या, सात-बारा उतारे, मिळकत पत्रक, मूळ नकाशे, हस्तांतरण कागदपत्रे आणि इतर शासकीय अभिलेख व्यवस्थित जतन करण्यात आले आहेत का, याची राज्यस्तरीय तपासणी करण्याची गरज असल्याचे इंगोले यांनी म्हटले आहे.

‘निर्मल स्वदेश ग्रुप’च्या म्हणण्यानुसार, जुन्या शासकीय मालमत्तांच्या नोंदी अपूर्ण अथवा गहाळ असल्याचा गैरफायदा काही ठिकाणी घेतला गेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या मालमत्तांवर अतिक्रमण झाले आहे का, त्यांचा अनधिकृत वापर होत आहे का किंवा त्यांच्या मालकीच्या नोंदींमध्ये काही बदल झाले आहेत का, याची चौकशी करणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर महसूल आणि ग्रामविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती स्थापन करून संपूर्ण राज्यातील संबंधित जिल्हा परिषद मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आ _ Government Property Inquiry Local Board School Board Maharashtraहे.

तसेच प्रत्येक मालमत्तेचे GIS (Geographic Information System) आधारित डिजिटल मॅपिंग करण्यात यावे. जुन्या अभिलेखांमधील माहिती, महसूल विभागाच्या नोंदी आणि प्रत्यक्ष जागेवरील स्थिती यांची सांगड घालून सर्व शासकीय मालमत्तांची डिजिटल नोंद तयार करावी, अशी मागणी इंगोले यांनी केली आहे.

या सर्वेक्षणामुळे शासकीय मालकीच्या जमिनींची नेमकी स्थिती स्पष्ट होण्यासोबतच अतिक्रमण झालेल्या अथवा नोंदींमध्ये तफावत असलेल्या मालमत्ता ओळखण्यास मदत होऊ शकते. _ Government Property Inquiry Local Board School Board Maharashtra

दरम्यान, शासकीय मालमत्तांचे अभिलेख गहाळ करण्यास किंवा त्यांचे योग्य जतन न करण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोष आढळल्यास विभागीय तसेच लागू कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

राज्यातील जुन्या लोकल बोर्ड आणि स्कूल बोर्डांच्या मालमत्तांचा स्वतंत्र राज्यस्तरीय आढावा घेऊन त्यांची सद्यस्थिती शासनाने स्पष्ट करावी आणि शासकीय मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी ‘निर्मल स्वदेश ग्रुप’चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब रामदास इंगोले यांनी केली आहे.

प्रतिनिधी : तुषार इंगोले _ Government Property Inquiry Local Board School Board Maharashtra

Cyber Security Awareness Session Jalgaon : जळगावमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती; ऑनलाइन फसवणुकीपासून बचावाचे मार्गदर्शन

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “Government Property Inquiry Local Board School Board Maharashtra : लोकल बोर्ड आणि स्कूल बोर्डाच्या जुन्या शासकीय मालमत्तांची चौकशी करा; ‘निर्मल स्वदेश ग्रुप’ची मागणी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed