Nashik Road Bus Stand Road Condition Protest
नाशिक | प्रतिनिधी : दिपक सरोदे
नाशिक रोड बस स्थानक परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. पावसामुळे संपूर्ण परिसर तलावमय झाला असून मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवासी, वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येविरोधात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलन करून संबंधित प्रशासनाला निवेदनही दिले आहे. मात्र, त्यानंतरही प्रशासन तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षीही या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. रस्ता दुरुस्तीच्या कामाला मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात आजतागायत कामाला सुरुवात झालेली नाही. परिणामी पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे आणि खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
नाशिक रोड बस स्थानकातून दररोज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ७०० ते ८०० बस फेऱ्या, तर सिटीलिंक बसच्या सुमारे १,००० फेऱ्या होतात. याशिवाय बस स्थानकालगतच रेल्वे स्थानक असल्यामुळे दररोज लाखो प्रवाशांची ये-जा या परिसरातून होत असते. अशा महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या चार ते पाच वर्षांपासून हीच परिस्थिती कायम आहे. यापूर्वी निधीअभावी काम रखडल्याचे कारण देण्यात येत होते. मात्र, आता कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असूनही या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मोठमोठ्या खड्ड्यांमुळे बसचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता असून एखादा गंभीर अपघात किंवा जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित विभागाने तातडीने रस्ता दुरुस्ती करून प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जळगाव जिल्हा बँक संचालकांच्या अपात्रतेच्या मागणीची सहकार आयुक्तांनी घेतली दखल


[…] […]
[…] […]
[1867]Sunwi | Link vào tải app và quay hũ đổi thưởng uy tín,Truy cập sunwi để trải nghiệm game quay hũ đổi thưởng hấp dẫn. Hướng dẫn cách chơi baccarat online và nạp tiền casino qua momo nhanh chóng. Tham gia ngay! visit: sunwi