Nashik ACB Bribe Caseगुटखा तस्करीच्या खोट्या गुन्ह्याची भीती दाखवत ९० हजारांची लाच स्वीकारताना पेठ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात.

Nashik ACB Bribe Case

नाशिक | MHDU News

नाशिक जिल्ह्यातील पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस अंमलदाराला चिकन व्यावसायिकाकडून ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. गुटखा तस्करीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पैशांची उकळपट्टी केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

तक्रारदार हे गुजरातमधील सुतारपाडा गावचे रहिवासी असून ते चिकन विक्रीचा व्यवसाय करतात. व्यवसायासाठी ते महाराष्ट्रातून कोंबड्यांची खरेदी करून गुजरातमध्ये वाहतूक करतात.

जून महिन्यात वांगणी परिसरात त्यांचे वाहन अडवून पेठ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार मनोज दगू गायकवाड (वय ३७) यांनी गाडीत कोंबड्या असतानाही गुटखा तस्करीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने व्यवसायाची कागदपत्रे दाखवूनही त्यांच्याकडून गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात यापूर्वी ६० हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर ५ जुलै २०२६ रोजी पुन्हा एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. अखेरीस ९० हजार रुपयांमध्ये व्यवहार निश्चित झाला.

सततच्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ९० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस अंमलदार मनोज गायकवाड यांना रंगेहात अटक करण्यात आली.

या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

Nashik ACB Bribe Case

रिमोटचे बटण दाबताच गायब व्हायची कारची नंबर प्लेट; देवळ्यात हायटेक गुटखा तस्करीचा पर्दाफाश

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Nashik ACB Bribe Case : गुटखा तस्करीच्या खोट्या गुन्ह्याची भीती दाखवून 90 हजारांची लाच; पेठ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *