Mlegaon Sakur GramSabha Corruption Allegations
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील साकुर गावात ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायतीच्या कारभारावरून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, सरकारी निधीतून करण्यात आलेली काही विकासकामे प्रत्यक्षात न करता केवळ कागदोपत्री दाखवण्यात आल्याचा आरोप केला आहे.
ग्रामस्थांच्या आरोपानुसार, सरकारी योजना आणि विकासकामांच्या अंमलबजावणीत मनमानी व अनियमितता करण्यात आली असून, गावात अपेक्षित विकासकामे प्रत्यक्षात झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
विशेषतः इंदिरानगरमधील पाण्याची टाकी, गावात एलईडी लाईट बसविण्याचे काम, गावांतर्गत मुरूम टाकण्याचे काम, झेडपी शाळेसाठी पाईपलाईन आणि भूमिगत गटार योजना या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या कथित प्रकारामध्ये ग्रामसेवक भरत श्रावण भोजने, सरपंच लताबाई रवींद्र अहिरे आणि सरपंचांचे पुत्र राजेंद्र रवींद्र अहिरे यांचे परस्पर संगनमत असल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. _ Mlegaon Sakur GramSabha Corruption Allegations
दरम्यान, सरकारी निधी नेमका कुठे खर्च झाला, कागदावर दाखवण्यात आलेली विकासकामे प्रत्यक्षात कुठे आहेत आणि संबंधित कामांचा खर्च व प्रत्यक्ष कामांची पडताळणी झाली आहे का, असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून, आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. _Mlegaon Sakur GramSabha Corruption Allegations
साकुर ग्रामपंचायतीतील या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे परिसरात चर्चा सुरू असून, आता प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
टीप : या वृत्तातील आरोप ग्रामस्थांनी ग्रामसभेदरम्यान केले आहेत. आरोपांची अधिकृत प्रशासकीय चौकशी व पडताळणी होणे बाकी आहे.
_Mlegaon Sakur GramSabha Corruption Allegations


[…] […]
This site is honestly a hidden gem. Everything from the registration to the actual gaming is seamless. I really enjoy 988wangame.