Dhule Khalane Danger Dumper Accidentखलाणे गावात भीषण अपघात — डंपरची बसथांब्यावर धडक, दोन ठार, दोन गंभीर जखमी; गावकऱ्यांचा ठिय्या आंदोलन

Dhule Khalane Danger Dumper Accident

धुळे जिल्ह्यातील खलाणे गावात आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. बसस्थानकावर प्रवासी बसची वाट पाहत बसलेल्या नागरिकांना भरधाव डंपरने चिरडले. या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. धडक एवढी जबर होती की बसथांब्यावर बसलेले प्रवासी जागेवरच उडाले.

Dhule Khalane Danger Dumper Accident

घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. संतप्त गावकऱ्यांनी बसस्थानकावरच ठिय्या आंदोलन सुरू केले असून त्यांचा ठाम इशारा आहे —

“जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह जागेवरून हलवणार नाही.”

गावकऱ्यांचा आरोप आहे की, या रस्त्यावरून अवैधरित्या मुरूमाने भरलेले डंपर वारंवार बेदरकारपणे धावत असतात, आणि प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते.

दरम्यान, जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

MHDU News : Vishal Bhadane Dhule Khalane Danger Dumper Accident

Pune Court Suicide Shocker : न्याय मिळत नसल्याच्या नैराश्यातून एक धक्कादायक घटना ; “कोर्टातच घेतला शेवटचा श्वास!”; सन 2000 पासून न्यायासाठी न्यायालयात सतत ये-जा करत…..

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “Dhule Khalane Danger Dumper Accident : धुळे-खलाणे बसस्थानकावर डंपरची धडक — 2 ठार, 2 गंभीर जखमी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed