APK File Online Fraud Nashik
नाशिक | २ ऑगस्ट २०२६: मोबाईलवर आलेली अनोळखी APK (Android Package Kit) फाईल डाऊनलोड करणे पुणे रोड परिसरातील एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. सायबर गुन्हेगारांनी मोबाईलवर नियंत्रण मिळवत संबंधिताच्या बँक खात्यातून तब्बल ₹१ लाख ६९ हजार ऑनलाइन व्यवहाराद्वारे लंपास केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी तक्रारदार व्यावसायिकाला ‘जोशी’ नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वतःला अॅटम टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत कंपनीसाठी वस्तू खरेदी करायच्या असल्याचे सांगितले. त्यानंतर कंपनीची माहिती भरण्यासाठी मोबाईलवर APK फाईल पाठवण्यात आली.
व्यावसायिकाने संबंधित फाईल डाऊनलोड करून त्यामध्ये माहिती भरल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मोबाईलचा तसेच बँक खात्याचा अॅक्सेस मिळवला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ₹१.६९ लाखांची रक्कम विविध ऑनलाइन व्यवहारांद्वारे परस्पर वर्ग करण्यात आली.
बँक खात्यातून पैसे वळते झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
APK File Online Fraud Nashik
⚠️ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा सूचना
अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या APK फाईल्स कधीही डाऊनलोड करू नका.
फक्त अधिकृत Google Play Store किंवा विश्वासार्ह स्रोतांवरूनच अॅप्स इन्स्टॉल करा.
कोणत्याही फाईलला परवानग्या (Permissions) देण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासणी करा.
संशयास्पद व्यवहार झाल्यास तात्काळ बँकेशी संपर्क साधून 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवा.
प्रतिनिधी : कुणाल दानेच APK File Online Fraud Nashik
नाशिकमध्ये डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी


[…] APK File Online Fraud Nashik : फाईल डाऊनलोड करताच नाशिकच… […]
Feeling lucky today and this app is the perfect place to test my streak. The graphics are top notch. Visit pkluckygameapk now.
Super addictive games and the daily rewards keep me coming back. I have told all my friends to join phjilii already!