Apoorv Dattak Yojana by Dr. Apurv Hiray at Hiray College Nashik
नाशिक | प्रतिनिधी (पंचवटी):
महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालय, पंचवटी, नाशिक येथे संस्था समन्वयक तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. अपूर्व प्रशांत Hiray यांच्या वाढदिवसानिमित्त ‘अपूर्व दत्तक योजना’ या सामाजिक उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
गरीब, अनाथ, अपंग तसेच होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळावी आणि आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये, या उदात्त हेतूने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “अपूर्व दत्तक योजना हा केवळ एक उपक्रम नसून समाजातील गरजू, अनाथ, अपंग व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी उचललेले संवेदनशील पाऊल आहे. शिक्षण हीच समाजपरिवर्तनाची खरी ताकद आहे आणि आर्थिक अडचणींमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हीच या योजनेमागील प्रेरणा आहे. डॉ. अपूर्व प्रशांत Hiray यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेली ही योजना अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरेल. अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांमुळे शिक्षणसंस्था आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ होते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रामाणिकपणे मेहनत घेऊन समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी. हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरेल.”
Apoorv Dattak Yojana by Dr. Apurv Hiray at Hiray College Nashik
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, “महाविद्यालय हे केवळ ज्ञानदानाचे केंद्र नसून सामाजिक उत्तरदायित्व जपणारी संस्था आहे. ‘अपूर्व दत्तक योजना’ ही गरजू, अनाथ, अपंग व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याला आधार देणारी आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारी स्तुत्य योजना आहे. डॉ. अपूर्वभाऊ प्रशांत Hiray यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेला हा उपक्रम शिक्षणासोबतच माणुसकीची मूल्ये जोपासणारा आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, ही भावना या योजनेतून व्यक्त होते. लाभार्थी विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करून शैक्षणिक प्रगतीसह चारित्र्यसंपन्न नागरिक बनावे.”
महाविद्यालयाचे कोर्स समन्वयक डॉ. संभाजी व्याळीज यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गुणवंत, गरजू, अनाथ, अपंग व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार देण्याच्या उदात्त हेतूने ‘अपूर्व दत्तक योजना’ सुरू करण्यात आली आहे.”
कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. व्ही. आर. निकम, डॉ. आर. व्ही. पाटील, पर्यवेक्षक प्रा. डॉ. प्रकाश शेवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या ५३ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते निवडपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ. किरण पिंगळे यांनी प्रमुख अतिथी डॉ. बी. जी. वाघ यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण सोमासे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मायबोली क्लबचे अध्यक्ष शुभम अहिरे यांनी मानले. (Apoorv Dattak Yojana by Dr. Apurv Hiray at Hiray College Nashik)
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– प्रतिनिधी : प्रथमेश महाले Apoorv Dattak Yojana by Dr. Apurv Hiray at Hiray College Nashik


[…] हिरे महाविद्यालयात डॉ. अपूर्व Hiray यांच… […]
Finally found a stable link to get the app. The installation was super smooth and the interface is very user-friendly. Highly recommend checking out gperyadownloadapp for a better experience.