Ajit Anantrao Pawar Jayanti२२ जुलै २०२६ रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांची जयंती राज्यभर अधिकृतरीत्या साजरी करण्यात येणार असून, शासनाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.

Ajit Anantrao Pawar Jayanti

मुंबई

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ जुलै २०२६ रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश २०२६ सालातील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांच्या यादीत केला आहे.

या परिपत्रकानुसार, २२ जुलै २०२६ (बुधवार) रोजी राज्यभर त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल.

तसेच, हा आदेश राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि इतर शासकीय संस्थांना लागू करण्यात आला आहे. संबंधित कार्यालयांनी जयंती कार्यक्रमाचे नियोजन करून शासनाच्या निर्देशानुसार कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व यंत्रणांमध्ये या कार्यक्रमाचे योग्य नियोजन व प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या कार्याला अधिकृत स्तरावर अभिवादन करण्यात येणार असून, राज्यभरात विविध ठिकाणी त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात येणार आहे.

Ajit Anantrao Pawar Jayanti

शेतकऱ्यांचे प्रश्न एरणीवरच; ‘तारीख पे तारीख’ आणि आश्वासनांनंतर रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचे अन्नत्याग आमरण उपोषण

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Ajit Anantrao Pawar Jayanti : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा राज्याच्या अधिकृत जयंती कार्यक्रमात समावेश”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *