Dhule Feriwala Policy Meeting Clash Thackeray BJPधुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील फेरीवाला धोरण बैठकीत ठाकरे गट व भाजप गटात राडा

धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयात फेरीवाला धोरण ठरवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीदरम्यान मोठा गोंधळ उडाला. या वेळी ठाकरे गट व भाजप गट यांच्यात जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्या

यांनी रस्त्यावर हातगाड्या लावणाऱ्या भाजी विक्रेत्यांसाठी योग्य जागा देऊन त्यांना न्याय मिळावा अशी ठाम मागणी केली. मात्र, या मागणीदरम्यान भाजपचे माजी नगरसेवक हिरामण गवळी यांनी अंगावर धावून गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून त्यात भाजप गटाचे पदाधिकारी धावताना दिसत आहेत.
या घटनेनंतर धुळेचे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

झालेल्या ठाकरे गट व भाजप गट राडाचा व्हिडिओ बघा:

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *