school van safety and fire extinguisher issue involving school children
नाशिक शहरातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळा आणि खासगी विद्यार्थिवाहतूक करणाऱ्या काही व्हॅनमध्ये फायर एक्स्टिंग्विशर, प्रथमोपचार पेटी तसेच आवश्यक सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसल्याची किंवा काही ठिकाणी त्या बंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे.
लहान मुलांना घेऊन धावणाऱ्या वाहनांना अचानक आग लागली, अपघात झाला किंवा अन्य आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तत्काळ उपाययोजना काय असतील, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही खासगी व्हॅनमध्ये वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसवले जात असल्याच्या तक्रारी आहेत. एका व्हॅनमध्ये तब्बल २० विद्यार्थ्यांना बसवले जात असल्याचे आरोप असून, त्यासाठी पालकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असल्याचेही सांगण्यात येत आहे. _ school van safety and fire extinguisher issue involving school children
याशिवाय उन्हाळी सुट्टीचे शुल्क, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सुट्ट्यांचे पैसे तसेच इतर अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारीही पालकांकडून करण्यात येत आहेत.
काही पालकांच्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांशी व्हॅन चालक किंवा कंडक्टरकडून शिवीगाळ, अरेरावी अथवा मारहाणीचे प्रकार होत असल्याचेही आरोप आहेत. मात्र, या आरोपांची संबंधित विभागांकडून अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे.
दरम्यान, शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाची फायर सेफ्टी तपासणी, प्रथमोपचार सुविधा, वाहनाची प्रवासी क्षमता, चालक-कंडक्टरची पात्रता आणि आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन यांची काटेकोरपणे तपासणी करण्याची मागणी होत आहे.
शिक्षण विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) आणि अग्निशमन विभागाने संयुक्तपणे विशेष तपासणी मोहीम राबवून शाळा व्हॅन आणि खासगी विद्यार्थिवाहतूक वाहनांची अचानक तपासणी करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड होणार नाही, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
कारण हा प्रश्न केवळ वाहतुकीच्या नियमांचा नाही; प्रश्न आहे तो नाशिकमधील हजारो चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा!
प्रतिनिधी : दिपक सरोदे _ school van safety and fire extinguisher issue involving school children


[…] […]
The variety of slot games here is amazing. I love how easy it is to navigate through the lobby. Best place to hang out is win24login.