Nashik Swine Flu Alert 43 Cases 3 Deaths
नाशिक : नाशिक शहरासह लगतच्या ग्रामीण भागात स्वाइन फ्लू अर्थात H1N1 इन्फ्लुएन्झाचा धोका वाढताना दिसत आहे. उपलब्ध ताज्या आरोग्यविषयक माहितीनुसार नाशिकमध्ये आतापर्यंत 43 रुग्ण स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळले असून, त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जानेवारीपासून आतापर्यंत तापसदृश आजार असलेल्या 68,122 नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले. त्यापैकी 229 जणांमध्ये स्वाइन फ्लूसदृश लक्षणे आढळल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यातून 43 रुग्ण स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आढळले. सध्या 12 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून 28 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
जानेवारी ते जून या सहा महिन्यांत स्वाइन फ्लूचे केवळ 7 रुग्ण आढळले होते. मात्र जुलै महिन्यात 21 नवीन रुग्ण, तर ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांतच 15 नवीन रुग्ण आढळल्याने संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक शहरातील 30 तर ग्रामीण भागातील 13 रुग्णांचा समावेश आहे. (Nashik Swine Flu Alert 43 Cases 3 Deaths)
मृतांमध्ये दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील 69 वर्षीय महिला, पिंपळणारे येथील 55 वर्षीय पुरुष आणि नाशिक शहरातील आडगाव परिसरातील 66 वर्षीय व्यक्तीचा समावेश असल्याचे वृत्त आहे.
स्वाइन फ्लूची प्रमुख लक्षणे (Nashik Swine Flu Alert 43 Cases 3 Deaths)
स्वाइन फ्लूमध्ये अचानक ताप येणे, खोकला, घसा खवखवणे, सर्दी किंवा नाक वाहणे, अंगदुखी, तीव्र डोकेदुखी आणि जास्त थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही रुग्णांमध्ये मळमळ, उलट्या किंवा जुलाबाची लक्षणेही दिसू शकतात.
नाशिककरांनी काय काळजी घ्यावी? (Nashik Swine Flu Alert 43 Cases 3 Deaths)
नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावेत, खोकताना किंवा शिंकताना तोंड-नाक रुमालाने झाकावे आणि डोळे, नाक व तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे.
गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे आणि आवश्यक असल्यास मास्कचा वापर करावा. ताप, खोकला किंवा इतर फ्लूसदृश लक्षणे जाणवत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःहून औषधे घेण्याऐवजी वैद्यकीय मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.
बाहेरून घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखणे ही सवय नागरिकांनी लावून घ्यावी. घरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि इतर संवेदनशील व्यक्तींच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
दरम्यान, नाशिक शहरातील स्वाइन फ्लूची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रशांत शेटे यांनी सांगितले असून, नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसताच तातडीने रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक महानगरपालिका, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांमध्ये स्वाइन फ्लूबाबत जनजागृती वाढवून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक गती देण्याची गरज आहे.
नाशिककरांनो, घाबरू नका; मात्र सतर्क राहा, स्वच्छता पाळा आणि लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या.
प्रतिनिधी : दिपक सरोदे Nashik Swine Flu Alert 43 Cases 3 Deaths


Feels like a real luxury casino experience from home. The VIP perks at 55vip777casino are amazing.