Chandwad Manmad Highway Accidentचांदवड-मनमाड महामार्गावर इर्टिगा कार झाडावर आदळून मनमाडच्या दोन मित्रांचा जागीच मृत्यू.

Chandwad Manmad Highway Accident

चांदवड, दि. ३० जुलै : चांदवड-मनमाड महामार्गावर गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ता अपघातात मनमाड येथील दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेमुळे मनमाड शहरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतांची ओळख शफीक फिटर आणि सागर बेदाडे अशी झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दोघेही नाशिकहून पहाटे कारने मनमाडकडे परतत होते. यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांची इर्टिगा कार रस्त्यालगतच्या झाडावर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला.

या भीषण अपघातात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलीस करीत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

प्रतिनिधी: संजय जाधव Chandwad Manmad Highway Accident

एमजीव्हीच्या फार्मसी महाविद्यालयाला क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाकडून प्रतिष्ठेचा ‘A’ ग्रेड

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

3 thoughts on “Chandwad Manmad Highway Accident : चांदवड-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; मनमाडच्या दोन मित्रांचा जागीच मृत्यू”
  1. Finally a gambling site that actually understands what players need. The live dealer tables are top notch and the streaming quality is crystal clear. I love how easy it is to navigate between different game categories and the payment options are very flexible. Reliable payouts and friendly staff make this my new daily stop. pkpakrumi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed