WhatsApp Hacked Case BJP MLA Seema Hirayसंशयास्पद फोन कॉलनंतर भाजप आमदार सीमा हिरे यांचे WhatsApp खाते हॅक; त्यांच्या नावाने पैशांची मागणी करणारे संदेश पाठविल्याने खळबळ.

WhatsApp Hacked Case BJP MLA Seema Hiray

नाशिक | प्रतिनिधी

सायबर फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना आता नाशिकमधील भाजप आमदार सीमा हिरे यांनाही त्याचा फटका बसला आहे. एका संशयास्पद फोन कॉलनंतर त्यांचे WhatsApp खाते हॅक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, त्यानंतर त्यांच्या नावाचा गैरवापर करून अनेक व्यक्तींना पैशांची मागणी करणारे संदेश पाठविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (२२ जुलै) आमदार सीमा हिरे आणि त्यांचे पती महेश हिरे मंत्रालयात असताना त्यांना एका परदेशी क्रमांकावरून फोन आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने ऑनलाइन शॉपिंगचे पार्सल पोहोचवायचे असून पत्ता मिळत नसल्याचे सांगत दुसऱ्या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले.

घरातील कोणीतरी ऑनलाइन खरेदी केली असावी, या समजुतीतून आमदार हिरे यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, कॉल लागताच काही क्षणांत तो कट करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या WhatsApp खात्यावर अनधिकृत प्रवेश मिळवत सायबर भामट्यांनी त्यांच्या नावाने ओळखीच्या व्यक्तींना “Need Your Help” अशा आशयाचे संदेश पाठवून आर्थिक मदतीची मागणी सुरू केली.

घटनेची माहिती मिळताच आमदार सीमा हिरे आणि महेश हिरे यांनी तातडीने नागरिकांना सावध केले. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आपले WhatsApp खाते हॅक झाल्याची माहिती दिली आणि त्यांच्या नावाने येणाऱ्या कोणत्याही आर्थिक मागणीला प्रतिसाद देऊ नये, असे स्पष्ट आवाहन केले.

यानंतर या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या या प्रकाराचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान, अनोळखी किंवा परदेशी क्रमांकावरून येणारे कॉल, संशयास्पद लिंक किंवा OTP संदर्भातील कोणतीही माहिती कोणालाही देऊ नये, तसेच अशा फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

WhatsApp Hacked Case BJP MLA Seema Hiray

आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली 1,077 नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ; 150 जणांचे रक्तदान

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *