Chandwad Samadhan Shibir Rahul Aher
चांदवड | प्रतिनिधी : संजय जाधव
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चांदवड येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ तसेच भव्य रक्तदान शिबिराचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या अभियानाच्या माध्यमातून महसूल, पंचायत समिती, नगर परिषद, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, परिवहन, नोंदणी आदी विविध शासकीय विभागांच्या सेवा आणि योजनांचा लाभ एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला. या उपक्रमातून एकूण १,०७७ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला.
शिबिरात ज्येष्ठ नागरिक कार्ड, सामाजिक अर्थसहाय्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पांदण रस्ता योजना, आयुष्मान भारत योजना, कृषी विभागाच्या विविध योजना तसेच महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला.
याचबरोबर आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात १५० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत मानवसेवेचा आदर्श निर्माण केला.
या कार्यक्रमास विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, तहसीलदार अनिल चव्हाण, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, तालुका कृषी अधिकारी निलेश मावळे, मुख्याधिकारी दिनेश सिणारे, सह दुय्यम निबंधक लोखंडे यांच्यासह अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
तसेच माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, नगराध्यक्ष वैभव बागुल, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष रघुनाथ आहेर, माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, भाजप नेते बाळासाहेब माळी, भाजप ज्येष्ठ नेते मोहन शर्मा, माजी सभापती पंढरीनाथ खताळ, रघुनाथ काळे, अनिल कोठुळे, शांताराम भवर, राजेश गांगुर्डे, बाजीराव वानखेडे, राहुल कोतवाल, डॉ. जीवन देशमुख यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या अभियानामागील मुख्य उद्देश म्हणजे शासनाच्या विविध योजना तळागाळातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात आणि नागरिकांना शासकीय सेवांसाठी अनावश्यक हेलपाटे मारावे लागू नयेत, हा होता. या उपक्रमामुळे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभ पद्धतीने मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
Chandwad Samadhan Shibir Rahul Aher
जंतर-मंतर आंदोलन प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्न, निष्पक्ष चौकशीची मागणी


[…] […]