MG Road Nashik Mobile Accessories Complaintएम.जी. रोडवरील काही मोबाईल ॲक्सेसरीज विक्रेत्यांविरोधात ग्राहकांच्या गंभीर तक्रारी.

MG Road Nashik Mobile Accessories Complaint

नाशिक | प्रतिनिधी : दिपक सरोदे

नाशिक शहरातील एम.जी. रोड येथील प्रधान पार्क परिसरात मोबाईल ॲक्सेसरीजच्या काही होलसेल विक्रेत्यांविरोधात ग्राहकांकडून विविध प्रकारच्या तक्रारी समोर येत आहेत.

ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी मोबाईल ॲक्सेसरीजना अवाजवी दर आकारले जात असून, वस्तू विक्री करताना बिल दिले जात नाही. तसेच अनेक विक्रेते वस्तूंवर गॅरंटी किंवा वॉरंटी देत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, खरेदी केलेली वस्तू दोषपूर्ण किंवा खराब आढळल्यास ती बदलून देण्यास नकार दिला जातो. काही प्रकरणांमध्ये ग्राहकांशी दमदाटी तसेच मारहाणीचे प्रकार घडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

ग्राहकांचे म्हणणे आहे की, मोबाईल ॲक्सेसरीजसाठी कोणतेही दरपत्रक (रेट चार्ट) प्रदर्शित केले जात नसल्याने मनमानी दर आकारले जात आहेत. तसेच बिल न दिल्यामुळे शासनाच्या कर महसुलाचाही मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, संबंधित परिसराजवळ जिल्हाधिकारी कार्यालय तसेच ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा असतानाही या कथित प्रकारांकडे संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत असल्याची भावना अनेक ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची संबंधित प्रशासनाने व ग्राहक संरक्षण विभागाने चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी आणि ग्राहकांची आर्थिक फसवणूक थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

MG Road Nashik Mobile Accessories Complaint

नेटबँकिंग सुरू करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ दाम्पत्याला ८.०८ लाखांचा गंडा; जीवे मारण्याची धमकी

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “MG Road Nashik Mobile Accessories Complaint : एम.जी. रोडवरील मोबाईल ॲक्सेसरीज विक्रेत्यांविरोधात ग्राहकांच्या गंभीर तक्रारी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *