College Road Spa Centre Police Raid Nashikकॉलेज रोडवरील डेजी वेलनेस स्पा सेंटरवर गंगापूर पोलिसांचा छापा; तीन महिलांची सुटका, मालक व मॅनेजरसह चौघांवर गुन्हा.

College Road Spa Centre Police Raid Nashik

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरातील डिसुझा कॉलनी येथे असलेल्या डेजी वेलनेस स्पा सेंटरवर गंगापूर पोलिसांनी छापा टाकत अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईदरम्यान तीन परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली असून, स्पा सेंटरच्या मालक महिला, मॅनेजर तसेच घटनास्थळी आढळून आलेल्या दोन ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रचीती गोसावी यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, दि. 15 जुलै रोजी दुपारी सुमारे 3:30 वाजता कॉलेज रोडवरील डिसुझा कॉलनी येथील डेजी वेलनेस स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला.

तपासादरम्यान स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी स्पा सेंटरच्या मालक कविता पवन कोरडे (वय 43, रा. रुक्मिणी सोसायटी, मखमलाबाद रोड, पंचवटी) आणि मॅनेजर अर्चना संजय मोरे (वय 32, रा. आनंदछाया बस स्टॉपजवळ, सातपूर) या संगनमताने स्पा सेंटरच्या माध्यमातून कुंटणखाना चालवत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

या कारवाईदरम्यान तीन परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या दोन ग्राहकांवरही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, स्पा सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून पैसे घेऊन अनैतिक व्यवसाय चालविला जात होता. याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध स्त्रियांचा अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कवाड करीत आहेत.

College Road Spa Centre Police Raid Nashik

पिंपळगाव टोलनाका परिसरात नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; 535 किलो गांजा जप्त, ₹1.12 कोटींचा मुद्देमाल हस्तगत

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “College Road Spa Centre Police Raid Nashik : कॉलेज रोडवरील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; कुंटणखाना उद्ध्वस्त, तीन महिलांची सुटका”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *