Pimpalgaon Toll Plaza Drug Seizure Nashik Rural Police
पिंपळगाव प्रतिनिधी – धीरज भावसार
नाशिक ग्रामीण जिल्ह्यात अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून सातत्याने धडक कारवाया सुरू आहेत. मा. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या आदेशान्वये ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
याच अनुषंगाने दि. १४ जुलै २०२६ रोजी पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, नाशिककडून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या एका पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात गांजा या अंमली पदार्थाची तस्करी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने पिंपळगाव टोलनाका परिसरात सापळा रचून MH-06-BG-1776 क्रमांकाच्या पिकअप वाहनावर छापा टाकला.
Pimpalgaon Toll Plaza Drug Seizure Nashik Rural Police
कारवाईदरम्यान वाहनातील संशयित राहुल शांताराम पाटील (वय ३३), रा. मुटकी, ता. जि. धुळे याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पंचांसमक्ष वाहनाची सखोल झडती घेण्यात आली असता पिकअप वाहनामध्ये ५३५ किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला.
प्राथमिक चौकशीत आरोपी हा कोणताही वैध परवाना नसताना मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा हा अंमली पदार्थ आपल्या ताब्यात बाळगून विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २०१/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. कायदा कलम ८(क) व २०(ब)(ii)(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे –
५३५ किलो गांजा (अंमली पदार्थ)
गुन्ह्यात वापरण्यात आलेली पिकअप गाडी (MH-06-BG-1776)
मोबाईल फोन
रोख रक्कम
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹१,१२,१४,००० (एक कोटी बारा लाख चौदा हजार रुपये) इतकी आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पिंपळगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक, मा. अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, नाशिक ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शन व सूचनांनुसार पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
अंमली पदार्थांची चोरट्या पद्धतीने होणारी तस्करी व बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर व प्रभावी कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Pimpalgaon Toll Plaza Drug Seizure Nashik Rural Police
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा राज्याच्या अधिकृत जयंती कार्यक्रमात समावेश


[…] पिंपळगाव टोलनाका परिसरात नाशिक ग्राम… […]