Nashik ZP Free Uniform Scheme Irregularities 2026मोफत गणवेश योजनेतील गुणवत्तेच्या अनियमिततेप्रकरणी नाशिक जिल्हा परिषद प्रशासनाची कठोर भूमिका; १६ मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा.

Nashik ZP Free Uniform Scheme Irregularities 2026

नाशिक

नाशिक जिल्ह्यात राज्य शासनाच्या मोफत शालेय गणवेश योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर अनियमितता समोर आली असून, शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार गणवेश पुरवला न गेल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी गंभीर दखल घेत १६ जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील विविध शाळांमधून गणवेशाचे नमुने संकलित करून त्यांची मान्यताप्राप्त वस्त्रोद्योग प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासणी करण्यात आली. या अहवालात बागलाण, सुरगाणा, चांदवड आणि पेठ तालुक्यातील १६ शाळांमध्ये पुरविण्यात आलेले गणवेश शासनाच्या निर्धारित गुणवत्तेच्या निकषांशी सुसंगत नसल्याचे निष्पन्न झाले.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शालेय गणवेशासाठी वापरल्या जाणाऱ्या कापडामध्ये पॉलिस्टर आणि कॉटनचे प्रमाण किमान ७०:३० किंवा ८०:२० असणे आवश्यक आहे. मात्र तपासणीत काही नमुन्यांमध्ये १०० टक्के पॉलिस्टर आढळले, तर काही ठिकाणी कॉटनचे प्रमाण आवश्यक मर्यादेपेक्षा अत्यल्प असल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणामुळे जिल्ह्यातील उर्वरित शाळांमध्येही खळबळ उडाली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

या शाळांचा समावेश

बागलाण तालुका: कोटबेल, दुधमाळ

सुरगाणा तालुका: माणी, आंबोडा, चिंचपाडा, बोरपाडा (ग)

चांदवड तालुका: सोग्रस, दुगाव, खडकओझर, आसरखेडे

पेठ तालुका: हरणगाव, आमलोन, आसस्बारी, माळेगाव, गारमाळ, देवगाव

जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित मुख्याध्यापकांकडून स्पष्टीकरण मागविण्याबरोबरच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर शासन नियमांनुसार आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांना दिल्या आहेत.

प्राथमिक शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालाच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित कोणत्याही योजनेत गुणवत्तेशी तडजोड सहन केली जाणार नाही, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.

Nashik ZP Free Uniform Scheme Irregularities 2026

नाशिकच्या श्री क्षेत्र दावल मलिक बाबा देवस्थानाच्या विकासाचा प्रश्न ऐरणीवर; 10 कोटींचा विकास आराखडा मंजूर, तरीही कामांना ब्रेक

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Nashik ZP Free Uniform Scheme Irregularities 2026 : मोफत शालेय गणवेश योजनेत अनियमितता; निकृष्ट गणवेश प्रकरणी १६ मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *