Shalarth ID Scam Nashik Crime Branch Arrestशालार्थ आयडी घोटाळ्यात धुळ्यातून प्रशांत वाडिले अटकेत; ११ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर.

Shalarth ID Scam Nashik Crime Branch Arrest

धुळे | MHDU News

राज्यातील बहुचर्चित शिक्षण विभागातील ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत संशयित संस्थाचालक व दलाल प्रशांत तुळशीराम वाडिले याला शनिवारी (११ जुलै) पहाटे धुळे येथून अटक केली. शालार्थ आयडीच्या माध्यमातून बनावट संस्था, बनावट आदेश आणि बनावट मान्यतांच्या आधारे शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

या प्रकरणात अटक झालेला प्रशांत वाडिले हा चौथा संशयित असून, त्याला रविवारी (१२ जुलै) नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वाडिले हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शिक्षक आघाडीचा धुळे जिल्हाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.

मार्च २०२६ मध्ये गुन्हा दाखल

या संपूर्ण प्रकरणात मार्च २०२६ मध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घोटाळ्याची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून, या तपासाचे प्राथमिक ११ हजार पानांचे दोषारोपपत्र नाशिक रोड न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

आतापर्यंत या प्रकरणात १६ संशयित निष्पन्न झाले असून, त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

कागदोपत्री ६५ शाळांचा दावा, प्रत्यक्षात केवळ दोन संस्था

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांत वाडिले याने कागदोपत्री ६५ पेक्षा अधिक आश्रमशाळा व शाळा असल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात साक्री आणि शिंदखेडा येथे केवळ दोनच संस्था अस्तित्वात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

तसेच, त्याने बनावट शिक्षण संस्थांची कागदपत्रे तयार करून त्याआधारे शेकडो शिक्षकांना बनावट नियुक्ती आदेश, बनावट मान्यता प्रमाणपत्रे आणि शालार्थ आयडीसाठी बनावट कागदपत्रे उपलब्ध करून दिली. या माध्यमातून संबंधितांना आर्थिक लाभ मिळवून देत शासनाची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

धुळ्यातून अटक (Shalarth ID Scam Nashik Crime Branch Arrest)

प्रशांत वाडिले हा धुळे येथे असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर विशेष तपास पथकाने कारवाई केली. सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, हवालदार कराड, गिते, येवले, तसेच अंबड युनिट-३चे उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, बोडके, पचलोरे आणि महाले यांच्या पथकाने शुक्रवारी (१० जुलै) रात्री धुळे येथे सापळा रचला.

शनिवारी (११ जुलै) पहाटे वाडिले याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून धुळे न्यायालयातून त्याची ट्रान्झिट कोठडी घेण्यात आली असून, रविवारी (१२ जुलै) त्याला नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

२३३ शाळा, ८२१ शिक्षक आणि तब्बल १२०० संशयित

विशेष तपास पथकाच्या तपासानुसार उत्तर महाराष्ट्रातील २३३ शाळांमधील ८२१ शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, सचिव, तसेच शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव आणि भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह सुमारे १२०० संशयित या घोटाळ्यात निष्पन्न झाले आहेत.

आत्तापर्यंतच्या तपासात १६ संशयितांविरोधात सबळ पुरावे मिळाले आहेत. यापूर्वी या प्रकरणात तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, किरण पाटील आणि राहुल पवार यांना अटक करण्यात आली होती. प्रशांत वाडिले हा या प्रकरणातील चौथा अटक झालेला संशयित आहे.

आणखी ‘मोठे मासे’ जाळ्यात येण्याची शक्यता

या घोटाळ्यात नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थाचालक, शिक्षक आणि काही अधिकारी सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष तपास पथकाने या प्रकरणात आणखी काही महत्त्वाच्या संशयितांवर कारवाई होण्याचे संकेत दिले आहेत.

प्राथमिक तपासानुसार, या संपूर्ण रॅकेटने संघटित पद्धतीने शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारत सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

वाडिलेवर नेमके आरोप काय?

धुळे जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बनावट मान्यता व शालार्थ मंजुरीचे आदेश तयार करणे.

कोणताही अधिकृत प्रस्ताव नसताना मागील तारखांच्या बनावट नियुक्ती आदेशांची निर्मिती करणे.

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर करून कागदपत्रे तयार करणे.

संबंधितांना वेतन तसेच मागील फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणे.

या संपूर्ण प्रक्रियेद्वारे शासनाची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणे.

Shalarth ID Scam Nashik Crime Branch Arrest

https://googleads.g.doubleclick.net/pagead/ads?client=ca-pub-9889898564657011&output=html&h=280&adk=4131350476&adf=4205152112&pi=t.aa~a.1043414356~rp.4&abgtt=6&w=1200&fwrn=4&fwrnh=100&lmt=1783838727&rafmt=1&to=qs&pwprc=8339696376&format=1200×280&url=https%3A%2F%2Fmhdu.in%2Fgovernment-removes-two-loan-waiver-conditions%2F&host=ca-host-pub-2644536267352236&fwr=0&pra=3&rpe=1&resp_fmts=3&asro=0&aimartd=4&aieuf=1&aicrs=1&fa=40&uach=WyJXaW5kb3dzIiwiMTkuMC4wIiwieDg2IiwiIiwiMTUwLjAuNzg3MS4xMDIiLG51bGwsMCxudWxsLCI2NCIsW1siTm90O0E9QnJhbmQiLCI4LjAuMC4wIl0sWyJDaHJvbWl1bSIsIjE1MC4wLjc4NzEuMTAyIl0sWyJHb29nbGUgQ2hyb21lIiwiMTUwLjAuNzg3MS4xMDIiXV0sMF0.&dt=1783838727829&bpp=2&bdt=2675&idt=131&shv=r20260709&mjsv=m202607070101&ptt=9&saldr=aa&abxe=1&cookie=ID%3D37ff0b616a24182c%3AT%3D1760079549%3ART%3D1783838711%3AS%3DALNI_Mb1srPYpfLiC2ENE3PkPW4-owlvrw&gpic=UID%3D000011a1af9e70f5%3AT%3D1760079549%3ART%3D1783838711%3AS%3DALNI_MZdyz0aM2zUFcj98Bf3fzUg4b23JQ&eo_id_str=ID%3Da59eb147f05a57fe%3AT%3D1777360294%3ART%3D1783838711%3AS%3DAA-AfjaJw4lF5_Xqb1ii-ApfUrec&prev_fmts=0x0&nras=2&correlator=6260264989033&frm=20&pv=1&u_tz=330&u_his=7&u_h=864&u_w=1536&u_ah=816&u_aw=1536&u_cd=24&u_sd=1.125&dmc=8&adx=247&ady=277&biw=1694&bih=811&scr_x=0&scr_y=0&eid=42533294%2C95393485&oid=2&pvsid=8572608527751628&tmod=1818453052&uas=1&nvt=1&ref=https%3A%2F%2Fmhdu.in%2Flatest-news%2F&fc=1920&brdim=3%2C0%2C3%2C0%2C1536%2C0%2C1554%2C823%2C1711%2C811&vis=1&rsz=%7C%7Cs%7C&abl=NS&fu=128&bc=31&bz=0.91&pgls=CAEaBTcuMC4x~CAEQBBoHMS4xODIuMA..&ifi=2&uci=a!2&fsb=1&dtd=140

Government Removes Two Loan Waiver Conditions : आंदोलनानंतर सरकारचा मोठा निर्णय; कर्जमाफीतील दोन जाचक अटी रद्द, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Shalarth ID Scam Nashik Crime Branch Arrest : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; ‘शालार्थ’ घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *