Ashadhi Wari Shabnam Bag Distribution Chandwadआषाढी वारीनिमित्त चांदवड-देवळ्यातील आठ दिंड्यांमधील वारकऱ्यांना २ हजार पर्यावरणपूरक शबनम पिशव्यांचे वाटप.

Ashadhi Wari Shabnam Bag Distribution Chandwad

चांदवड | MHDU News

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या चांदवड आणि देवळा तालुक्यातील आठ दिंड्यांमधील हजारो वारकऱ्यांना आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांच्या वतीने २ हजार पर्यावरणपूरक शबनम कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘प्रदूषणमुक्त वारी – निर्मल वारी’ हा उपक्रम राबविण्यात आला.

धोडप किल्ला परिसर, विजयनगर, कानमंडळे, पाथरशेंबे, तळेगाव, वडाळीभोई, देनेवाडी तसेच देवळा तालुक्यातील दहिवड येथील दिंड्यांमध्ये या पिशव्यांचे वितरण करण्यात आले. वारीदरम्यान आवश्यक साहित्य सुरक्षित ठेवता यावे आणि प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक जीवनशैलीला चालना मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

यावेळी आमदार डॉ. राहुल दादा आहेर यांनी सांगितले की, “वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा” या भावनेतून श्रद्धा, सेवा आणि पर्यावरण संरक्षण यांचा सुंदर संगम घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अधिकाधिक वारकऱ्यांपर्यंत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचावा, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास ह.भ.प. सौरभ महाराज जाधव, ह.भ.प. समाधान महाराज, ह.भ.प. निळोबा महाराज बोरसे, भाजप तालुकाध्यक्ष संदीप काळे, ॲड. शांताराम भवर यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ashadhi Wari Shabnam Bag Distribution Chandwad

Maharashtra Farmer Loan Waiver 2026 : ५० हजारांची अट रद्द; २ लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *