Radisson Hotel Sewage Pollutionरेडिसन हॉटेलच्या सांडपाण्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त; घोडांबे धरणाच्या पाण्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता

Radisson Hotel Sewage Pollution

सुरगाणा तालुक्यातील हतगड ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रेडिसन हॉटेलमधील वेस्टेज व सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याची तक्रार परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे. या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, दूषित पाणी जमिनीत झिरपून शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये मिसळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

हॉटेलमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावता ते परिसरात सोडले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. सांडपाण्यामुळे डास, कीटक व दुर्गंधीचा त्रास वाढला असून, भविष्यात रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे हॉटेल परिसरापासून जवळच घोडांबे धरण आहे. सांडपाणी सातत्याने जमिनीत झिरपत राहिल्यास त्याचा परिणाम भूजलासह धरणातील पाण्यावर होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या धरणाच्या पाण्यावर परिसरातील सुमारे १२ ते १३ गावे अवलंबून असल्याचे सांगण्यात येत असल्याने जलप्रदूषणाचा धोका निर्माण झाल्यास मोठ्या लोकसंख्येच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

वर्षातून तीन वेळा सूचना, तरीही प्रश्न कायम _ Radisson Hotel Sewage Pollution

सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत हॉटेल व्यवस्थापनाला वर्षातून तीन वेळा सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येते. तहसीलदार रामजी राठोड यांनीदेखील याबाबत सूचना दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रशासनाने तातडीने पाहणी करण्याची मागणी _ Radisson Hotel Sewage Pollution

ग्रामपंचायत, महसूल प्रशासन तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून सांडपाण्याचे नमुने तपासावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच घोडांबे धरणातील पाण्यावर सांडपाण्याचा कोणताही परिणाम झाला आहे का, याची तपासणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

ज्या धरणाच्या पाण्यावर अनेक गावांतील नागरिक अवलंबून आहेत, त्या पाण्याच्या स्रोताला एखाद्या व्यावसायिक आस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे धोका निर्माण होत असेल, तर हा केवळ अस्वच्छतेचा प्रश्न नसून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर विषय आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ सूचना न देता प्रत्यक्ष पाहणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

यावेळी माजी सरपंच साजोळे काळू बागुल, रमेश पवार, बोरगावचे सरपंच अशोक गवळी, सामाजिक कार्यकर्ते आनंद पडवळ, पोहाळी येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ गायकवाड, केशव बागुल, वामण बागुल, लक्ष्मण बागुल यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-बोरगाव : प्रतिनिधी लक्ष्मण बागुल _ Radisson Hotel Sewage Pollution

Old Pension Teachers Silent March Nashik : जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा मूक मोर्चा; 25 सप्टेंबरपर्यंत निर्णयाची मागणी

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *