पालकमंत्री गिरीष महाजन पाचोरा तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी करतानाजळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी पाचोरा तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी केली.

पाचोरा तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याकडून पाहणी

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जलसंपदा व जलव्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी पाचोरा तालुक्यातील वेरुळी खु., वाडी-शेवाळे, शिंदाड, सातगाव डोंगरी या अतिवृष्टी व पुरग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली.

अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड, पशुधनाची हानी, संसारोपयोगी साहित्य व धान्याचे नुकसान तसेच ग्रामीण भागातील रस्ते व पुलांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे आढळले.

या पाहणीवेळी पालकमंत्री गिरीष महाजन यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी प्रशासनाला तातडीने खालील उपाययोजना करण्याचे निर्देश दिले –

शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत.

नुकसान झालेल्या रस्ते व पूल दुरुस्तीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.

या पाहणीदरम्यान आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सा.बां. विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed