Nashik Simhastha Kumbh 2027 Private Tent City"सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांच्या निवासासाठी खासगी जमिनीवर टेंट सिटी उभारण्याचे नियोजन"

Nashik Simhastha Kumbh 2027 Private Tent City

नाशिक : २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या Nashik Simhastha Kumbh 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या निवासाची अतिरिक्त व्यवस्था उभारण्यासाठी खासगी जमिनीवर ‘टेंट सिटी’ उभारण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. सिंहस्थ काळात मोठ्या संख्येने भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन तात्पुरत्या निवासव्यवस्थेचा हा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने यासाठी सविस्तर Standard Operating Procedure (SOP) निश्चित केली असून, खासगी जमीनमालक तसेच जमीनमालकाशी नोंदणीकृत सामंजस्य करार (MoU) केलेल्या संस्थांना टेंट सिटी उभारणीसाठी अर्ज करता येणार आहे.

किमान दोन एकर खासगी जमीन आवश्यक _ Nashik Simhastha Kumbh 2027 Private Tent City

टेंट सिटीसाठी प्रस्तावित जमीन खासगी मालकीची, सलग आणि बोजामुक्त असणे आवश्यक राहणार आहे. संबंधित जमीन नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत असावी आणि तिचे क्षेत्रफळ किमान दोन एकर असणे आवश्यक आहे.

टेंट सिटी ही तात्पुरती व्यवस्था असणार असून मंजूर कालावधी संपल्यानंतर तंबू आणि इतर तात्पुरत्या संरचना हटवून जमीन पूर्ववत करावी लागणार आहे.

भाविकांसाठी मूलभूत सुविधा बंधनकारक _ Nashik Simhastha Kumbh 2027 Private Tent City

टेंट सिटीमध्ये केवळ निवासाची व्यवस्था न करता भाविकांसाठी आवश्यक सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत.

यामध्ये स्वच्छतागृहे, स्नानगृहे, पिण्याचे पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन, वाहनतळ, भोजन व्यवस्था, सुरक्षा तसेच वैद्यकीय आणि आपत्कालीन सुविधांचा समावेश असेल. दिव्यांग भाविकांसाठी आवश्यक अनुकूल सुविधाही उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे.

नदी-नाल्यांमध्ये सांडपाणी सोडण्यास मनाई _ Nashik Simhastha Kumbh 2027 Private Tent City

टेंट सिटीमध्ये पर्यावरण संरक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. नदी, नाला किंवा नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात कोणत्याही प्रकारचे सांडपाणी सोडता येणार नाही.

तसेच उघड्यावर कचरा टाकणे किंवा कचरा जाळण्यासही मनाई असेल. कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण करून अधिकृत संस्थेमार्फत दररोज कचरा संकलित करावा लागणार आहे.

ओल्या कचऱ्यावर शक्य त्या ठिकाणी कंपोस्टिंग किंवा बायोमिथेनेशनद्वारे प्रक्रिया करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी _ Nashik Simhastha Kumbh 2027 Private Tent City

टेंट सिटीमध्ये पिण्याचे आणि इतर वापराचे पाणी यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. बिगर-पर्वणीच्या काळात सात दिवसांतून एकदा, तर प्रमुख पर्वणीच्या काळात दररोज पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करावी लागणार आहे.

या तपासण्यांची नोंदही संबंधित व्यवस्थापनाकडे ठेवावी लागणार आहे.

अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्था

प्रत्येक टेंट सिटीसाठी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून स्वतंत्र Emergency Action Plan तयार करावा लागणार आहे. यामध्ये आग, गर्दीचे व्यवस्थापन, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, भाविकांचे स्थलांतर तसेच हवामानाशी संबंधित आपत्कालीन परिस्थितींचा समावेश असेल.

वीज व्यवस्थेसाठीही विशेष सुरक्षा निकष लागू असतील. वायरिंग सुरक्षित आणि संरक्षित असणे, आवश्यक सुरक्षा उपकरणे बसविणे तसेच भाविकांना निवासासाठी जागा उपलब्ध करून देण्यापूर्वी विद्युत सुरक्षा तपासणी करून घेणे आवश्यक राहणार आहे.

अर्जासोबत कोणती कागदपत्रे आवश्यक? _ Nashik Simhastha Kumbh 2027 Private Tent City

खासगी टेंट सिटी उभारण्यासाठी अर्ज करताना प्रस्तावित जागेची माहिती, जमीनमालकीची कागदपत्रे, GPS Coordinates, आराखडा, तंबूंची संख्या व प्रकार, वाहनतळाची माहिती, पाणी-वीज-सांडपाणी व्यवस्थेचा तपशील, अग्निसुरक्षा उपाययोजना तसेच ऑपरेटरचा अनुभव आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

प्राप्त प्रस्तावांची संबंधित विभागांकडून छाननी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज, अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिस विभागाशी संबंधित ना-हरकत प्रमाणपत्रे आणि वैधानिक परवानग्या घेणे ऑपरेटरसाठी बंधनकारक राहणार आहे.

सिंहस्थासाठी अतिरिक्त निवासव्यवस्थेवर भर _ Nashik Simhastha Kumbh 2027 Private Tent City

Nashik Simhastha Kumbh 2027 च्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी निवास, वाहतूक, पार्किंग, आरोग्य आणि आपत्कालीन व्यवस्थेचे नियोजन केले जात आहे. खासगी टेंट सिटीच्या माध्यमातून उपलब्ध निवासक्षमता वाढवून शहरातील कायमस्वरूपी पायाभूत सुविधांवरील अतिरिक्त ताण कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सिंहस्थ काळातील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सुरक्षित निवास, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि आपत्कालीन तयारीसाठी स्पष्ट निकष निश्चित करण्यात आल्याचे सांगितले आहे.

खासगी जमीनमालक आणि ऑपरेटर यांना सिंहस्थाच्या व्यवस्थेत सहभागी होण्याची संधी मिळणार असून, भाविकांना सुरक्षित आणि सुविधायुक्त निवास उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

महादूत जनबिंदू प्रतिनिधी : दिपक सरोदे _ Nashik Simhastha Kumbh 2027 Private Tent City

Nashik Citylink Ticketless Travel Action : विनातिकीट प्रवास करणाऱ्या २८४ प्रवाशांवर कारवाई; १४ हजारांचा दंड वसूल

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Nashik Simhastha Kumbh 2027 Private Tent City : सिंहस्थासाठी खासगी जमिनीवर ‘टेंट सिटी’; भाविकांच्या निवासासाठी अतिरिक्त व्यवस्था”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *