Nashik Online Task & Crypto Scamऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने नाशिकमधील तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक; सायबर पोलिसांकडून तपास सुरू.

Nashik Online Task & Crypto Scam

नाशिक | प्रतिनिधी : कुणाल दानेच | दि. २५ जुलै २०२६

नाशिकमध्ये घरबसल्या पार्टटाईम जॉब आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीवर ३० टक्के अधिक परताव्याचे आमिष दाखवत एका तरुणाची तब्बल ₹१४ लाख ६४ हजारांची ऑनलाइन सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नाशिक सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे ते २५ जून २०२६ या कालावधीत सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘सुजाता सोनवणे’, ‘माधवी’ आणि ‘अद्विका’ या नावांनी संपर्क साधणाऱ्या महिलांनी संबंधित तरुणाला घरबसल्या पार्टटाईम जॉबची ऑफर दिली. सुरुवातीला पंचतारांकित हॉटेल्सना ऑनलाइन रिव्ह्यू देण्यासारखे साधे टास्क देण्यात आले.

विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीच्या टास्कचे मानधन तरुणाच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर अधिक कमाईचे आमिष दाखवत त्याला पेड टास्क स्वीकारण्यास प्रवृत्त करण्यात आले. मोबाईलवर विविध लिंक पाठवून टास्क पूर्ण झाल्याचे तसेच मिळालेल्या रकमेचे बनावट तपशील दाखवून त्याची दिशाभूल करण्यात आली.

यानंतर आरोपींनी क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास ३० टक्के नफा मिळेल, असे सांगत विविध यूपीआय आयडी आणि बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले. या आमिषाला बळी पडलेल्या तरुणाने टप्प्याटप्प्याने एकूण ₹१४.६४ लाखांची रक्कम जमा केली.

मात्र, गुंतवलेली रक्कम आणि नफ्यासह परतावा मागितल्यानंतर संशयितांनी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणाने नाशिक सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून संबंधित आरोपींचा शोध सुरू केला असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सायबर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील पार्टटाईम जॉब, ऑनलाइन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित ऑफरची खातरजमा करावी, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

Nashik Online Task & Crypto Scam

Railway Food Quality Complaints MHDU News : रेल्वेतील निकृष्ट जेवणामुळे प्रवासी संतप्त; तुकाराम मुंढे यांनी लक्ष घालावे, नागरिकांची मागणी

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *