Nashik Jail Road Old Water Tank Demolition
नाशिक | MHDU News
नाशिकच्या जेलरोड परिसराची अनेक दशकांपासून ओळख बनलेली जुनी पाण्याची टाकी अखेर पाडण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असला, तरी या वास्तूच्या पाडकामामुळे परिसरातील नागरिकांच्या भावना मात्र दाटून आल्या आहेत.
ही टाकी केवळ पाणीपुरवठ्याची व्यवस्था नव्हती, तर जेलरोडची ओळख आणि हजारो नागरिकांच्या आठवणींचा अविभाज्य भाग होती. “टाकीजवळ भेटू” हे वाक्य अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले होते. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते परिसरातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात या टाकीशी निगडित असंख्य आठवणी आहेत.
वर्षानुवर्षे उन्हात, पावसात आणि वाऱ्यात ताठ उभी राहून या टाकीने हजारो घरांची तहान भागवली. त्यामुळे अनेक नागरिक तिच्याकडे परिसराच्या ‘जीवनवाहिनी’ आणि ‘माऊली’ म्हणून पाहत होते.
नवीन पाण्याची टाकी उभारण्यात आल्यानंतर जुनी टाकी सुरक्षेच्या कारणास्तव जमीनदोस्त करण्यात आली. आता त्या जागी नवीन विकासाची पावले पडतील, मात्र जेलरोडकरांच्या मनात या ऐतिहासिक वास्तूचे स्थान कायम अढळ राहणार आहे.
जेलरोडच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा शेवट झाला असला, तरी या पाण्याच्या टाकीशी जोडलेल्या आठवणी कायम जिवंत राहतील.
(भावनिक लेखन – राजेश शांताराम भुसारे यांच्या भावना व आठवणींवर आधारित.)
Mahadut Janbindu : Vishal Baadane Nashik Jail Road Old Water Tank Demolition
नियमभंगामुळे 7 हॉटेल्सचे परवाने निलंबित; 4 हॉटेल्स बंद करण्याचे आदेश


[…] जेलरोडची ऐतिहासिक पाण्याची टाकी इतिह… […]