Nashik Food Poisoning Investigation at Aakhatwade :
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आखतवाडे गावात संशयित अन्न विषबाधेची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री मटणाचे जेवण केल्यानंतर आणि त्यानंतर दही सेवन केल्यानंतर एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तर 78 वर्षीय शांताराम ह्याळीज यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन (FDA) पथक आखतवाडे येथे दाखल झाले. पथकाने संबंधित ठिकाणाहून विविध खाद्यपदार्थांचे नमुने संकलित केले असून ते तपासणीसाठी अधिकृत प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. गेल्या काही तासांपासून प्रशासनाकडून घटनास्थळी सखोल चौकशी सुरू आहे.
प्राथमिक तपासात विषबाधा नेमकी मटणामुळे झाली की दही अथवा इतर कोणत्या खाद्यपदार्थामुळे झाली, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. अन्न तयार करण्याची प्रक्रिया, वापरलेले साहित्य तसेच संबंधित व्यक्तींची माहिती प्रशासनाकडून तपासली जात आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे आखतवाडे गावासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांनी अन्नपदार्थांच्या स्वच्छता व सुरक्षिततेबाबत अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Mahdut Janbindu : Vishal BHadane Nashik Food Poisoning Investigation at Aakhatwade

Nashik Food Poisoning Investigation at Aakhatwade :
Nashik : A suspected food poisoning incident has been reported from Aakhatwade village in Satana taluka of Nashik district. An elderly farmer couple suddenly fell ill after consuming mutton followed by curd on Sunday night. Both were rushed to a hospital, where 68-year-old Dwarkabai Shantaram Hyalij tragically died during treatment.
Meanwhile, 78-year-old Shantaram Hyalij is undergoing treatment in the ICU of a private hospital in Malegaon, and his condition is reported to be critical.
Following the incident, a Food and Drug Administration (FDA) team reached the village and collected food samples from the spot. The samples will be sent to an authorized laboratory for analysis while officials continue a detailed investigation.
Authorities have not confirmed whether the suspected food poisoning was caused by the mutton, curd, or any other food item. The exact cause will be known only after the laboratory test reports are received.
The incident has created shock across Aakhatwade village and the Nashik district.


[…] नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील … […]