Karmabhoomi Express accident near Nashik Road — two dead, one injured criticallyनाशिक रोड परिसरात कर्मभूमी एक्स्प्रेसमधून तीन युवक खाली पडल्याने दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Karmabhoomi Express Accident Nashik

नाशिक : मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारमधील रकसोलकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसमध्ये (Karmabhoomi Express) शनिवारी (ता. १८ ऑक्टोबर) रात्री भीषण दुर्घटना घडली. नाशिक रोड परिसरात तीन युवक धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक युवक गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(Karmabhoomi Express Accident Nashik)

शनिवार रात्री कर्मभूमी एक्स्प्रेस नाशिक रोड स्थानकावर थांबली नसल्याने काही प्रवासी दरवाजाजवळ उभे होते. दरम्यान, ढिकलेनगर परिसरातील जेल रोडवरील हनुमान मंदिराजवळ तीन युवक रेल्वेतून खाली पडल्याची माहिती ओढा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक आकाश यांनी नाशिक रोड रेल्वे प्रशासनाला दिली.(Karmabhoomi Express Accident Nashik)

माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी व हवालदार भोळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वे पटरीवरील किलोमीटर 190/1 ते 190/3 दरम्यान दोन युवक मृतावस्थेत, तर एक युवक गंभीर जखमी अवस्थेत आढळला.

जखमी युवकास तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मृत आणि जखमी झालेल्या युवकांची ओळख अद्याप पटलेली नाही. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असल्याने दरवाजाजवळ उभे असताना तोल जाऊन हे युवक खाली पडल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हे युवक सणानिमित्त गावी जात होते की बिहार विधानसभा निवडणुकीसाठी, याचा तपास सुरू आहे.(Karmabhoomi Express Accident Nashik)

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्तांकडे त्यांची ओळख पटवणारी कोणतीही कागदपत्रे नव्हती. निरीक्षक सपकाळे यांनी सांगितले की, जखमी युवकाला सध्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून, प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे अशा दुर्घटना वाढताना दिसत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि नाशिक रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, पुढील तपास सुरू आहे.

MHDU News : Vishal Bhdane Karmabhoomi Express Accident Nashik

 सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

KarmabhoomiExpress #NashikAccident #NashikRoad #TrainAccident #MaharashtraNews #NashikNews #MHDU #BreakingNews #RailwayNews #NashikLive #mhdunews #mhdusocial

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Karmabhoomi Express Accident Nashik Road: Two Dead, One Critical | नाशिक रोडजवळ कर्मभूमी एक्स्प्रेसमधून 3 युवक खाली पडले; दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक”
  1. 188be is where I make my bets, man. Good odds, easy to navigate, and they pay out quick, no messing about. Put your money where your mouth is at 188be!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed