Cyber Fraud Nashik Senior Couple Net Banking Scam
प्रतिनिधी : कुणाल दानेच
नाशिक : नेटबँकिंग सुरू करून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्याने पंचवटीतील एका ज्येष्ठ दाम्पत्याची तब्बल ८ लाख ८ हजार ५९९ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरात राहणारे ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची पत्नी हे दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. संबंधित व्यक्तीने स्वतःची ओळख इंडसइंड बँकेचा अधिकारी अशी करून देत, “तुमचे नेटबँकिंग सुरू करून देतो,” असे सांगून दाम्पत्याचा विश्वास संपादन केला.
फोनवरील व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दाम्पत्याने आपल्या दोन्ही बँक खात्यांशी संबंधित डेबिट कार्डची माहिती संबंधित व्यक्तीला दिली. ही माहिती मिळताच सायबर भामट्याने काही मिनिटांतच त्यांच्या दोन्ही खात्यांमधून टप्प्याटप्प्याने ८ लाख ८ हजार ५९९ रुपये परस्पर वर्ग करून घेतले.
बँक खात्यातून पैसे वळते झाल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नागरिकांनी तातडीने त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने मदत करण्याऐवजी त्यांना शिवीगाळ करत “ही बाब कोणाला सांगितली तर जीवे मारून टाकू,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा सायबर फसवणुकीचा धोका अधोरेखित झाला आहे. बँक किंवा कोणतीही अधिकृत संस्था फोनवरून डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती, CVV, OTP किंवा नेटबँकिंगची गोपनीय माहिती मागत नाही. नागरिकांनी अशा फोन कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Cyber Fraud Nashik Senior Couple Net Banking Scam
नाशिकच्या ग्रामीण भागात ‘झिरो स्नेकबाईट डेथ’ मोहीम; 240 स्वयंसेवक करणार जनजागृती


[…] नेटबँकिंग सुरू करण्याच्या बहाण्याने … […]
[8319]st666 – Link vào chính thức và tải app game nổ hũ đổi thưởng,Truy cập st666 để trải nghiệm game nổ hũ đổi thưởng, tìm hiểu cách chơi baccarat online và nạp tiền casino qua momo nhanh chóng. Đăng ký tài khoản ngay. visit: st666