Chandwad ₹8 Crore Development Worksचांदवड शहरातील सुमारे ८ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता; निविदा प्रक्रिया पूर्ण, लवकरच कामांना सुरुवात.

Chandwad ₹8 Crore Development Works

चांदवड : शहराच्या विकासाला मोठी चालना

चांदवड शहराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळाली असून, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) योजना तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत सुमारे ८ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या विकासकामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूषण जयचंद कासलीवाल यांनी दिली._ Chandwad ₹8 Crore Development Works

या विकासकामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांचे सहकार्य लाभल्याचे कासलीवाल यांनी सांगितले.

शहरातील रस्ते, पावसाळी पाण्याचा निचरा, सार्वजनिक सुविधा, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता तसेच नागरिकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांच्या विकासाला या निधीतून प्राधान्य देण्यात आले आहे.

प्रमुख विकासकामे _ Chandwad ₹8 Crore Development Works

  1. डांबर विहीर ते बागवान गल्ली रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.
  2. घोडके नगर येथील हॉस्पिटल ते पारस डुंगरवाले यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.
  3. हॉटेल भैरवनाथ ते इंद्रायणी कॉलनी रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.
  4. प्रभाग क्रमांक ५ मधील विविध ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहेत.
  5. शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा व वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अग्रवाल यांच्या घरामागील नाला, आशीर्वाद हॉस्पिटलमागील नाला, डॉ. अमोल केदारे हॉस्पिटलसमोरील नाला आणि महालक्ष्मी नगर येथील नाला येथे सिमेंट काँक्रीट बॉक्स कल्व्हर्ट उभारण्यात येणार आहेत.
  6. चांदवड शहरात अद्ययावत मटन मार्केट उभारण्यात येणार आहे.
  7. श्री गजानन महाराज मंदिर येथे सभामंडप बांधण्यात येणार आहे.
  8. शहरात श्वान निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे.
  9. शहरातील विविध ठिकाणी सौरऊर्जा आधारित स्ट्रीट लाईट बसविण्यात येणार आहेत.
  10. नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत विविध विकासकामांसह प्रभाग क्रमांक १६ मध्ये महिला व पुरुषांसाठी नवीन सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार आहे.
  11. रोहिदास नगर येथे नवीन जिमखाना उभारण्यात येणार आहे.
  12. रवी बडोदे यांच्या घरापासून देविदास बडोदे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.
  13. कालिका देवी रोड येथे सार्वजनिक शौचालय उभारण्यात येणार आहे.
  14. दलित वस्ती भागात सौरऊर्जा हायमास्ट व सौर स्ट्रीट लाईट तसेच कालिका देवी रस्त्यावर ४० सोलर पथदिवे बसविण्यात येणार आहेत.
  15. शर्मा वस्ती, गुरुकुल कॉलनी, बाजार तळ, नाईकवाडीपुरा आणि सावता नगर येथे सुसज्ज व डिजिटल अंगणवाडी इमारतींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

निविदा प्रक्रिया पूर्ण; कामांना लवकरच सुरुवात _ Chandwad ₹8 Crore Development Works

या विकासकामांसाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष विकासकामे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे होणार असल्याने नागरिकांना रस्ते, पाणी निचरा, प्रकाश व्यवस्था आणि सार्वजनिक सुविधांच्या बाबतीत दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

भूषण कासलीवाल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शहरातील विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला असून, या कामांना लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

Chandwad ₹8 Crore Development Works

«“चांदवड शहरातील रस्ते, पावसाळी पाण्याचा निचरा, सार्वजनिक सुविधा, प्रकाश व्यवस्था आणि नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे विकासकामांना विलंब झाला; मात्र आता या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच सर्व विकासकामांचे उद्घाटन करण्यात येणार असून, जनतेच्या जनकल्याणासाठी आणि जनहिताच्या कामांसाठी मी कटिबद्ध आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, आमदार डॉ. राहुल आहेर यांचेही वेळोवेळी सहकार्य मिळत आहे.”»

— भूषण जयचंद कासलीवाल, प्रथम नगराध्यक्ष, चांदवड

-प्रतिनिधी : संजय जाधव Chandwad ₹8 Crore Development Works

Nashik Government Office Modernisation Ayush Prasad : ₹22.08 Crore Provision Announced – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा नागरिकांसाठी मोठा पुढाकार

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed