Satara Female Doctor Suicide Case | PSI Rape Allegation | Phaltan Shocking Newsसाताऱ्यातील फलटण येथील महिला डॉक्टरचा मृतदेह हॉटेलमध्ये आढळल्याने परिसरात खळबळ; PSI वर बलात्काराचा गंभीर आरोप

Satara Doctor Suicide Case

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात आणि फलटण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागाच्या एका वादात अडकल्या होत्या. तपासणीसंदर्भातील प्रकरणामुळे त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू झाली होती. या चौकशीमुळे त्या मानसिक तणावाखाली गेल्या होत्या. अखेरीस त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपले आयुष्य संपवले.

महिला डॉक्टरने यापूर्वीच आपल्या वरिष्ठांना लेखी तक्रार देत, “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन” असा इशारा दिला होता. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे दिसते.

फलटणमधील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. परंतु या घटनेला आता धक्कादायक वळण लागले आहे. (Satara Doctor Suicide Case)

मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरने आपल्या हातावरच आत्महत्येचे कारण लिहिले होते. त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, “PSI गोपाल यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर यांनी चार महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला.”

या प्रकरणावर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “घटनेचे सर्व तपशील समजून घेत आहोत. पोलीस अधीक्षकांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर सुसाईड नोट आढळली असेल, तर ती अत्यंत गंभीर बाब आहे. दोषींवर कठोर कारवाई होईल.”

दरम्यान, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी सांगितले की, “या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येत असून सखोल तपास सुरू आहे.” (Satara Doctor Suicide Case)

ही घटना केवळ वैद्यकीय क्षेत्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी हादरवून टाकणारी आहे. महिला सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

MHDU News : Vishal Bhadane Satara Doctor Suicide Case

SataraCrime #SataraNews #PhaltanNews #DoctorSuicide #PSIGopal #MaharashtraPolice #CrimeUpdate #BreakingNews #MarathiNews #MHDU #MHDUMaharashtra #ViralNews #SataraViral #MaharashtraCrime #IndianNews #MHDUUpdates #SocialAwareness #JusticeForDoctor

Diwali Safety and Sensitivity Tips

By MHDU Team

"MH Daily Update Team (MHDU) ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, सरकारी योजना, नोकरी अपडेट्स, राजकीय घडामोडी आणि समाजातील महत्वाच्या घडामोडी वेळेवर आणि अचूकपणे आपल्या पर्यंत पोहोचवण्याचे काम करते. आम्ही विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेवर भर देतो."

2 thoughts on “Satara Doctor Suicide Case साताऱ्यात धक्कादायक प्रकार; PSI कडून चार वेळा बलात्कार आणि छळ, महिला डॉक्टरने आत्महत्या केली….0”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *