Ladki Bahin Yojana eKYC scam alert informationलाडकी बहीण योजनेच्या eKYC प्रक्रियेत स्कॅम समोर, सरकारने दिला इशारा

Ladki Bahin Yojana eKYC Scam Alert :

महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळते. मात्र, अलीकडेच या योजनेच्या eKYC प्रक्रियेत मोठा स्कॅम समोर आला आहे. अनेक फसवे वेबसाईट्स बनवून महिलांची खासगी माहिती व बँक डिटेल्स चोरल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा ₹1500 थेट बँक खात्यात जमा केले जातात. आजच्या घडीला तब्बल 2.25 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.

👉 eKYC करण्याची प्रक्रिया :

eKYC का आहे महत्वाचं?

राज्य महिला व बालविकास मंत्रालयाने जाहीर केलं आहे की, प्रत्येक लाभार्थी महिलेला दरवर्षी जून महिन्यात eKYC करणं बंधनकारक असेल. यामागचा उद्देश म्हणजे —

अपात्र महिलांना योजनेतून वगळणे

पात्र महिलांपर्यंत योग्य लाभ पोहोचवणे

योजनांमध्ये पारदर्शकता राखणे

भविष्यात डिजिटल सत्यापनाद्वारे इतर योजनांचा लाभ सोप्या पद्धतीने मिळवता यावा

अलीकडील आकडेवारीनुसार, राज्यातील तब्बल 26 लाखांहून अधिक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं आहे. अगदी काही प्रकरणांमध्ये पुरुषांनी महिलांच्या नावाने योजनेचा लाभ घेतल्याचंही समोर आलं आहे. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी eKYC प्रक्रिया कठोर करण्यात आली आहे.

स्कॅम कसा घडतोय?

‘लाडकी बहीण योजनेची eKYC’ असं गुगलवर सर्च केल्यास, काही फसवे वेबसाईट्स समोर येत आहेत. यामध्ये hubcomut.in नावाची वेबसाईट सर्वाधिक चर्चेत आहे. जर एखाद्या महिलेने या खोट्या वेबसाईटवर जाऊन आपली माहिती भरली तर —

तिची खासगी माहिती चोरी होण्याचा धोका आहे.

थेट बँक खातं रिकामं होऊ शकतं.

लाभार्थी महिला आर्थिक संकटात सापडू शकते.

लाभार्थींनी काय करावं?

फक्त सरकारी अधिकृत वेबसाईटवरच eKYC करावी.

कोणत्याही अनोळखी लिंक किंवा वेबसाईटवर बँक डिटेल्स, आधार क्रमांक किंवा OTP शेअर करू नये.

शंका आल्यास लगेचच जवळच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

मोबाईलवर आलेले अनोळखी SMS किंवा व्हॉट्सअॅप लिंकवर क्लिक करू नका.

सरकारचं आवाहन

राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की, लाडकी बहीण योजनेची eKYC प्रक्रिया फक्त अधिकृत पोर्टलवरच करावी. कोणत्याही खाजगी वेबसाईट किंवा लिंकवर माहिती भरल्यास तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी ही योजना सुरक्षितपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, नागरिकांनी जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे.

https://mhdu.in/saptashrungi-devi-wani-shaktipeeth/: Ladki Bahin Yojana eKYC Scam Alert: सावधान! खोट्या वेबसाईट्समुळे रिकामं होऊ शकतं बँक खातं

dofollow

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “Ladki Bahin Yojana eKYC Scam Alert: सावधान! खोट्या वेबसाईट्समुळे रिकामं होऊ शकतं बँक खातं”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed