Mahavitaran Action Nashikमहावितरणच्या वीजयंत्रणेतील तांत्रिक कामे खासगी किंवा अनधिकृत व्यक्तींकडून करून घेतल्यास कठोर कारवाईचा इशारा.

Mahavitaran Action Nashik

नाशिक : महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेमधील तांत्रिक आणि जोखमीची कामे खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाकडून करून घेतल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर बडतर्फी किंवा सेवासमाप्तीसारखी कठोर कारवाई केली जाऊ शकते. याबाबत महावितरणकडून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलणे, डीओ फ्यूज बदलणे, विद्युत वाहिनीमधील बिघाड शोधणे, तांत्रिक दुरुस्ती करणे, वीजपुरवठ्याशी संबंधित ग्राहकांच्या तक्रारी सोडवणे, वीजबिलांची वसुली करणे तसेच थकबाकीदार ग्राहकांचे मीटर काढणे यासारखी कामे अधिकृत आणि प्रशिक्षित तांत्रिक कर्मचाऱ्यांनीच करणे अपेक्षित आहे. _ Mahavitaran Action Nashik

महावितरणच्या निदर्शनास आले आहे की, काही ठिकाणी तारमार्ग संवर्गातील कर्मचारी ही कामे स्वतः न करता खासगी व्यक्ती किंवा अनधिकृत मनुष्यबळाच्या माध्यमातून करून घेत असल्याच्या तक्रारी मुख्यालय स्तरावर प्राप्त झाल्या आहेत.

वीज वितरण यंत्रणेवरील कामांसाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान, प्रशिक्षण आणि सुरक्षा नियमांची माहिती नसलेल्या व्यक्तींना काम दिल्यास विद्युत तसेच यांत्रिक अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित खासगी व्यक्ती, महावितरणचे कर्मचारी आणि ग्राहक यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्यासोबतच महावितरणच्या विद्युत यंत्रणेचे व मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

‘Central Electricity Authority (Measures relating to Safety and Electric Supply) Regulations, 2023’ मधील नियम 3 नुसार वीज वितरण सेवेशी संबंधित कामे करण्यासाठी अधिकृत व्यक्ती असणे आवश्यक आहे. त्यामुळे महावितरणकडून अधिकृतपणे नामनिर्देशित न केलेल्या किंवा अपात्र खासगी व्यक्तीकडून वीज यंत्रणेवर कोणत्याही प्रकारचे काम करून घेणे हे अनधिकृत आणि नियमबाह्य ठरू शकते.

या गंभीर बाबींची दखल घेत महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी परिपत्रकाद्वारे क्षेत्रीय मुख्य अभियंते आणि अधीक्षक अभियंत्यांना कठोर निर्देश दिले आहेत. वीज वितरणाच्या कामांमध्ये कोणत्याही परिस्थितीत खासगी किंवा अनधिकृत मनुष्यबळाचा वापर होत नाही, याची वेळोवेळी खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. _ Mahavitaran Action Nashik

अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करून काम करून घेतल्याचे आढळल्यास किंवा अशा प्रकारच्या गैरवर्तणुकीमुळे दुर्घटना, विद्युत अपघात अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

चौकशीअंती संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास महावितरणच्या सेवाविनियमांनुसार बडतर्फी किंवा सेवासमाप्तीसारखी कठोर कारवाई केली जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे. _ Mahavitaran Action Nashik

महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे सुरक्षित संचालन, देखभाल व दुरुस्ती तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करणे ही संबंधित अभियंते आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे वीज यंत्रणेवरील कामे करताना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महादूत जनबिंदू प्रतिनिधी : दीपक सरोदे _ Mahavitaran Action Nashik

Dr Nilesh Jejurkar Police Custody Nashik : पत्नीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी डॉ. नीलेश जेजुरकर पोलिसांच्या ताब्यात; शनिवारी न्यायालयात हजर करणार – नाशिक

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “Mahavitaran Action Nashik : महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे केल्यास बडतर्फीसारखी कठोर कारवाई”
  1. I’ve been looking for a reliable way to access my account and this site is perfect. Everything loads fast and the login process is smooth. Highly recommend ta903login for a hassle-free experience!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *