Chandwad Taluka Level School Volleyball Competition
चांदवड : नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक, चांदवड तालुका क्रीडा समिती आणि श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. विविध शाळांमधील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत सामन्यांमध्ये चांगली रंगत आणली.
स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे होते. स्पर्धेचे उद्घाटन श्री. पी. पी. गाळणकर, डॉ. गोटन जैन, डॉ. दत्ता शिंपी, आर. एस. पाटील, डी. एम. जैन, संदीप ललवाणी आणि सचिन राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्हॉलीबॉल खेळाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना खेळभावना, जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण सरावाचे महत्त्व पटवून दिले. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य विकसित करून मोठे यश संपादन करावे, यासाठी त्यांनी खेळाडूंना प्रेरित केले._ Chandwad Taluka Level School Volleyball Competition
स्पर्धेत चांदवड तालुक्यातील एकूण २२ शाळांनी सहभाग नोंदविला. विविध वयोगटांमध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यांमध्ये नेमिनाथ जैन विद्यालय, महाराणी उषाराजे होळकर विद्यालय व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पी. डी. सुराणा कनिष्ठ महाविद्यालय, रायपूर, खडक ओझर आणि पारेगाव येथील संघांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या संघांनी कळवण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात चांदवड तालुका क्रीडा स्पर्धा प्रमुख निरंजन गायकवाड यांनी स्पर्धेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. तसेच व्हॉलीबॉल खेळाच्या नियमांची माहिती देत सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुक्यातील विविध शाळांचे क्रीडा शिक्षक निरंजन गायकवाड, अजय नायर, जीवन शिंदे, निलेश सदगीर यांच्यासह क्रीडा शिक्षक-शिक्षिका आणि अनेक क्रीडाप्रेमी उपस्थित होते. पंच म्हणून असलम शेख आणि जुबेर शेख यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे आयोजन क्रीडा शिक्षक दत्ता ठाकरे आणि युवराज ठोंबरे यांनी उत्कृष्ट नियोजनातून केले. त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध आणि खेळाडूवृत्तीपूर्ण वातावरणात पार पडली._ Chandwad Taluka Level School Volleyball Competition
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि चुरशीच्या सामन्यांमुळे चांदवड तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेला चांगली रंगत आली. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या संघांकडून आता कळवण येथे होणाऱ्या स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-प्रतिनिधी : संजय जाधव _ Chandwad Taluka Level School Volleyball Competition


[…] Chandwad Taluka Level School Volleyball Competition : चांदवड तालुकास्त… […]
Quick and easy login process every single time. I appreciate the security measures they have in place to keep our data safe. odin188login is the way to go.