Maharashtra Voter List SIR 2026महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर.

Maharashtra Voter List SIR 2026

मुंबई, दि. 19 ऑगस्ट 2026 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (Special Intensive Revision – SIR) सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत गृहभेटीद्वारे गणना प्रपत्र भरून घेण्याची प्रक्रिया 17 ऑगस्ट 2026 रोजी पूर्ण झाली आहे. त्यानंतर मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना आणि प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासंदर्भातील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण 24 ऑगस्टपर्यंत_ Maharashtra Voter List SIR 2026

सुधारित कार्यक्रमानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना 24 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करून नागरिकांना दावे व हरकती दाखल करण्याची संधी देण्यात येईल.

31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दावे-हरकतींचा कालावधी

31 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट झालेले नसलेल्या पात्र नागरिकांना या कालावधीत आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

तसेच 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक 6 ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे.

29 ऑक्टोबरपर्यंत दावे-हरकतींचा निपटारा_ Maharashtra Voter List SIR 2026

31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर 2026 या कालावधीत नोटिसांबाबतची कार्यवाही तसेच प्राप्त दावे व हरकतींचा नियमानुसार निपटारा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदारांनी काय करावे?

नागरिकांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून पाहावेत. नाव समाविष्ट नसल्यास किंवा मतदार यादीतील नोंदीबाबत काही त्रुटी असल्यास निर्धारित कालावधीत संबंधित अर्ज, दावा किंवा हरकत दाखल करावी.

या विशेष सखोल पुनरिक्षणामुळे मतदार याद्या अधिक अचूक व अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार असून, पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

-प्रतिनिधी : दिपक सरोदे_ Maharashtra Voter List SIR 2026

Nashik Contract Cleaning Workers Special Inspection : कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरीपासून वेतनापर्यंत विशेष तपासणी; EPF-ESIC, किमान वेतन आणि सुरक्षा साधनांची होणार पडताळणी

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Maharashtra Voter List SIR 2026 : अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed