Maharashtra Government Free School Bag Scheme 2026
नाशिक : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याच्या उपक्रमांतर्गत मोफत शालेय दप्तर (School Bag) उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
शासन निर्णयानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता १ली ते ५वी तसेच इयत्ता ६वी ते ८वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन School Bag पुरविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी ₹१७४ कोटी १९ लाख ३५ हजार ४२४ रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
ई-निविदेद्वारे School Bag ची खरेदी_ Maharashtra Government Free School Bag Scheme 2026
School Bag पुरविण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शासकीय विभागाच्या कार्यालयीन खरेदीसाठी लागू असलेल्या कार्यपद्धतीनुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ई-निविदेमध्ये न्यूनतम दरधारक (L-1) यांची निवड संबंधित शासन नियमांनुसार करण्यात येणार आहे. निविदा अंतिम करताना शासनाने निश्चित केलेली कार्यपद्धती तसेच प्रचलित नियम विचारात घेणे बंधनकारक राहणार आहे.
Design, Supply, Transportation आणि GST चा समावेश_ Maharashtra Government Free School Bag Scheme 2026
शासन निर्णयातील महत्त्वाच्या अटींनुसार School Bag च्या निविदा किमतीमध्ये DESIGN, SUPPLY (including transportation), GST तसेच इतर सर्व बाबींचा एकत्रित समावेश असणार आहे.
त्यामुळे निविदाकाराला या बाबींसाठी स्वतंत्रपणे अतिरिक्त रक्कम मागता येणार नाही. निविदेत नमूद केलेल्या अटी व शर्तींच्या आधारेच खरेदी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
शैक्षणिक साहित्य पुरवठा योजनेचा संदर्भ_ Maharashtra Government Free School Bag Scheme 2026
शासन निर्णयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याच्या योजनेचाही संदर्भ देण्यात आला आहे. यामध्ये School Kit, प्रयोगशाळा साहित्य, डेस्क-बेंच, शैक्षणिक साहित्य आदी बाबींचा समावेश आहे.
या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी School Bag पुरविण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२०२६-२७ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून खर्च_ Maharashtra Government Free School Bag Scheme 2026
या खरेदीचा खर्च सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात उपलब्ध होणाऱ्या संबंधित तरतुदीमधून भागविण्यात येणार आहे. निधी वितरणासाठी शासनाकडून स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
ही प्रशासकीय मान्यता शासन निर्णयातील अटी व शर्ती, प्रचलित खरेदी नियम आणि वित्तीय अधिकारांच्या नियमानुसार राहणार आहे.
शासन निर्णयाची माहिती
शासन निर्णय दिनांक : १९ ऑगस्ट २०२६
क्रमांक : संकीर्ण-२०२६/प्र.क्र.२४३ (ई-१७८६०२३)/एसडी-१
एकूण प्रस्तावित रक्कम : ₹१७४ कोटी १९ लाख ३५ हजार ४२४
या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांना मोफत School Bag उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याच्या दृष्टीने हा शासनाचा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
-प्रतिनिधी : पत्रकार दीपक सरोदे_ Maharashtra Government Free School Bag Scheme 2026
Avanti Snacks Nashik FDA Action : गंगापूर रोडवरील अवंती स्नॅक्सचा परवाना निलंबित


[…] […]