Harihar Fort Entry Closed Indefinitelyहरिहर गडावर पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी; पावसाळ्यातील धोकादायक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वन विभागाचा निर्णय.

Harihar Fort Entry Closed Indefinitely

नाशिक : सोशल मीडियावरील रिल्स आणि व्हिडिओंमुळे सध्या हरिहर गड आणि ब्रह्मगिरी पर्वत पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. वीकेंडला या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असून, त्यामुळे वाहतूक कोंडीसोबतच अपघातांचा धोका देखील वाढला आहे. या पार्श्वभूमीवर हरिहर गडाबाबत वन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करून हरिहर गडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. त्र्यंबक प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडून बुधवारी (दि. 19 ऑगस्ट) याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे._ Harihar Fort Entry Closed Indefinitely

पावसाळ्यात हरिहर गडावरील कातळात कोरलेल्या पायऱ्या मोठ्या प्रमाणात निसरड्या होतात. त्यातच अरुंद वाटा, उंच कडे, दाट धुके, अचानक बदलणारे हवामान आणि परिसरातील धबधब्यांमुळे चढाई अधिक धोकादायक ठरू शकते. श्रावण महिन्यामुळे भाविक आणि पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वन विभागाने प्रवेशबंदीचा निर्णय घेतला आहे.

गुरुवारपासून हरिहर गडावर पूर्णवेळ प्रवेशबंदी लागू करण्यात आली असून, पुढील आदेश मिळेपर्यंत गड पर्यटनासाठी बंद राहणार आहे.

वन विभागाने पर्यटकांना पुढील आदेश येईपर्यंत हरिहर गडाकडे न जाण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. प्रवेशबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

त्यामुळे सोशल मीडियावरील रिल्स पाहून हरिहर गडावर जाण्याचा प्लॅन करणाऱ्या ट्रेकर्स आणि पर्यटकांनी सध्या गडाकडे जाणे टाळावे. पावसाळ्यातील प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणेच सुरक्षित ठरणार आहे.

-प्रतिनिधी : कुणाल दानेच_ Harihar Fort Entry Closed Indefinitely

Maharashtra Government Free School Bag Scheme 2026 : इयत्ता १ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांना मोफत School Bag; ₹१७४ कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Harihar Fort Entry Closed Indefinitely : हरिहर गडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद; पर्यटकांना जाण्यास मनाई”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed