Hiray College Open Campus Placement Drive 17 Students Selectedहिरे महाविद्यालयातील ओपन कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये १७ विद्यार्थ्यांची पुढील निवड प्रक्रियेसाठी निवड.

Hiray College Open Campus Placement Drive 17 Students Selected

पंचवटी : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पंचवटी, नाशिक येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल आणि Joyalukkas यांच्या संयुक्त विद्यमाने ओपन कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले.

या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये Joyalukkas यांच्या वतीने Sales Executive पदासाठी फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. भरती प्रक्रियेदरम्यान आकाश महेश बामणे व मयूर जगन्नाथ बच्छाव यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेत त्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमात विविध विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. त्यापैकी १७ विद्यार्थ्यांची पुढील निवड प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले. तसेच पुढील निवड प्रक्रियेसाठी निवड झालेल्या १७ विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या ओपन कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

प्रतिनिधी : प्रथमेश महाले _ Hiray College Open Campus Placement Drive 17 Students Selected

Pankaja Munde Nashik Kumbh 2027 Environment Review : पंकजा मुंडेंचा नाशिक मनपात सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापनाचा आढावा

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “Hiray College Open Campus Placement Drive 17 Students Selected : हिरे महाविद्यालयात ओपन कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह; १७ विद्यार्थ्यांची निवड”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *