NASHIK NMC Independence Day Slaughterhouse Closureस्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा मनपाचा आदेश.

NASHIK NMC Independence Day Slaughterhouse Closure

नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबत नाशिक महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने जाहिर निवेदन प्रसिद्ध केले आहे.

महानगरपालिका प्रशासनाने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मनपा हद्दीत कोणत्याही जनावरांची कत्तल करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. संबंधित कत्तलखाने या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जनावरांची कत्तल करताना कोणी आढळून आल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महानगरपालिकेने दिला आहे.

त्यामुळे नाशिक शहरातील नागरिक तसेच संबंधित व्यावसायिकांनी महानगरपालिकेच्या या आदेशाची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

१५ ऑगस्टनिमित्त नाशिक शहरातील कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे.

-प्रतिनिधी : कुणाल दानेच NASHIK NMC Independence Day Slaughterhouse Closure

Smart Meter Electricity Bill Shock in Hingoli : 8 हजार कमाई, वीजबिल थेट 2 लाखांवर; हिंगोलीत गरीब कुटुंबाला मोठा धक्का

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “NASHIK NMC Independence Day Slaughterhouse Closure : स्वातंत्र्य दिनानिमित्त नाशिक शहरातील सर्व कत्तलखाने बंद; मनपाचा आदेश”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed