Smart Meter Electricity Bill Shock in Hingoliहिंगोलीत स्मार्ट मीटरनंतर सफाई कामगार महिलेला २ लाख १८ हजार रुपयांचे वीजबिल आल्याने खळबळ.

Smart Meter Electricity Bill Shock in Hingoli

हिंगोली शहरातील सिद्धार्थ नगर परिसरात स्मार्ट मीटरनंतर आलेल्या अवाढव्य वीजबिलामुळे एका गरीब कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. महिन्याला अवघे ८ ते साडेआठ हजार रुपये उत्पन्न असलेल्या सफाई कामगार महिलेला तब्बल २ लाख १८ हजार रुपयांचे वीजबिल आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

रेल्वे स्टेशन परिसरात साफसफाईचे काम करून संबंधित महिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्या घरात यापूर्वी साधारणपणे ७०० ते ८०० रुपयांच्या आसपास मासिक वीजबिल येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीसाठी तब्बल लाखोंच्या घरात बिल आकारण्यात आले.

इतकी मोठी रक्कम पाहून कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यानंतर संबंधित महिलेने महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बिलाबाबत तक्रार केली. अधिकाऱ्यांकडून बिलाच्या रकमेत काही प्रमाणात कपात करण्यात आल्याचे सांगण्यात आले असले, तरी सुधारित रक्कमही त्यांच्या आर्थिक क्षमतेच्या तुलनेत मोठी आहे._ Smart Meter Electricity Bill Shock in Hingoli

महिन्याला जेमतेम आठ हजार रुपयांचे उत्पन्न असताना लाखो रुपयांचे वीजबिल भरणे कसे शक्य आहे, असा प्रश्न या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. त्यातच बिल वेळेत न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्यासंदर्भातील मोबाइल संदेश मिळत असल्याने कुटुंबाचा मानसिक त्रास वाढला आहे._ Smart Meter Electricity Bill Shock in Hingoli

स्मार्ट मीटरमुळे वीजवापराचे अचूक मोजमाप होऊन ग्राहकांना पारदर्शक बिलिंगचा फायदा मिळेल, असा दावा केला जात असताना अशा प्रकारच्या प्रचंड बिलामुळे स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची तांत्रिक तपासणी करून चुकीचे बिल असल्यास तत्काळ दुरुस्ती करावी आणि संबंधित कुटुंबाला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या घटनेमुळे स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिलात अचानक झालेल्या वाढीबाबत ग्राहकांच्या मनातील चिंता पुन्हा समोर आली आहे.

-प्रतिनिधी : दिपक सरोदे Smart Meter Electricity Bill Shock in Hingoli

Nashik Job Fair 14 August 2026 : नाशिकमध्ये बेरोजगार युवकांसाठी १४ ऑगस्टला रोजगार मेळावा; ४० हून अधिक रोजगाराच्या संधी

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Smart Meter Electricity Bill Shock in Hingoli : 8 हजार कमाई, वीजबिल थेट 2 लाखांवर; हिंगोलीत गरीब कुटुंबाला मोठा धक्का”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed