SPPUCTO Teachers Protest Pune NEP-2020"SPPUCTO संघटनेच्या वतीने NEP-2020 आणि प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुणे विद्यापीठाच्या संचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन."

SPPUCTO Teachers Protest Pune NEP-2020

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटना (SPPUCTO) यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत कार्यभार निश्चितीमध्ये सर्व शैक्षणिक घटकांचा (All Academic Verticals) समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी विद्यापीठाच्या संचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

SPPUCTO संघटनेच्या वतीने प्राध्यापकांच्या विविध शैक्षणिक व सेवाविषयक प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्या

संघटनेने पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत : SPPUCTO Teachers Protest Pune NEP-2020

  1. NEP-2020 अंतर्गत कार्यभार निश्चितीमध्ये सर्व शैक्षणिक घटकांचा (All Academic Verticals) समावेश करावा.
  2. UGC/NET-SET पात्र कंत्राटी प्राध्यापकांना पदोन्नतीचा लाभ मिळावा.
  3. प्राध्यापकांच्या CAS पदोन्नतीसह प्रलंबित शैक्षणिक व सेवाविषयक प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा.

७ ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन

या मागण्यांसाठी ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून विद्यापीठाच्या संचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे.

संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश वाळुंज व सरचिटणीस डॉ. प्रवीण ताटे-देशमुख यांनी आंदोलनाची माहिती दिली.

SPPUCTO संघटनेने शासन तसेच विद्यापीठ प्रशासनाने आपल्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

प्राध्यापकांच्या कार्यभार निश्चिती, पदोन्नती तसेच प्रलंबित शैक्षणिक व सेवाविषयक प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी संघटनेची भूमिका आहे.

प्रतिनिधी : प्रथमेश महाले SPPUCTO Teachers Protest Pune NEP-2020

Nashik Potholes 13 Engineers Issued Show Cause Notices : खड्ड्यांकडे दुर्लक्ष; १३ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस, आयुक्तांची कडक कारवाई

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “SPPUCTO Teachers Protest Pune NEP-2020 : NEP-2020 अंतर्गत सर्व शैक्षणिक घटकांचा समावेश करण्याची मागणी; संचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed