Free Health Checkup Camp at Hiray College Nashikहिरे महाविद्यालय, पंचवटी येथे समाजश्री प्रशांतदादा हिरे निरामय आरोग्य केंद्र, वनस्पतीशास्त्र विभाग आणि अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व व्याख्यान संपन्न.

Free Health Checkup Camp at Hiray College Nashik

पंचवटी, नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त), पंचवटी, नाशिक येथे समाजश्री प्रशांतदादा हिरे निरामय आरोग्य केंद्र व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल, नाशिक यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर व आरोग्यविषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते व मार्गदर्शक डॉ. प्रवीण केंगे (B.A.M.S., M.D. (A.M.), P.G.C.C.H., Ayurved Physician) यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रवीण केंगे म्हणाले, “बहुतेक आजारांचे मूळ आपल्या पचनप्रक्रियेशी संबंधित असते. त्यामुळे केवळ विविध आजारांच्या लक्षणांवर उपचार न करता आजाराच्या मुळावर उपचार करणे अधिक महत्त्वाचे आहे.”

निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार, नियमित दिनचर्या आणि पचनक्रिया सुरळीत ठेवणे यांचे महत्त्व त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. आरोग्याच्या समस्या उद्भवल्यानंतर केवळ लक्षणांवर उपचार करण्यापेक्षा त्यामागील मूळ कारण समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Free Health Checkup Camp at Hiray College Nashik)

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राकेश पाटील यांनी आयुर्वेद ही प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली प्रभावी उपचारपद्धती असून, आजच्या आधुनिक काळातही आयुर्वेदिक उपचारांचे महत्त्व कायम असल्याचे सांगितले. निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदातील आहार-विहार आणि उपचारपद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात उपस्थितांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

याप्रसंगी समाजश्री प्रशांतदादा हिरे निरामय आरोग्य केंद्राचे समन्वयक डॉ. जे. एम. शेवाळे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. बी. शिसोदें, डॉ. सतीश तांबे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. याशिवाय महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रवीण पाटील यांनी केले, तर प्रा. रुपाली घुमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

– प्रतिनिधी : प्रथमेश महाले Free Health Checkup Camp at Hiray College Nashik

Chandwad Taluka School Wrestling Competition : चांदवड तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “Free Health Checkup Camp at Hiray College Nashik : “बहुतेक आजारांचे मूळ पचनप्रक्रियेत; लक्षणांवर नव्हे तर आजाराच्या मुळावर उपचार महत्त्वाचे” – डॉ. प्रवीण केंगे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed