Shreekshetra Chandreshwargad Guru Pournima 2026चांदवड येथील श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला.

Shreekshetra Chandreshwargad Guru Pournima 2026

चांदवड : श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे बुधवारी (दि. २९ जुलै) गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध धार्मिक विधी, गुरुपूजन, प्रवचन, गुरुमंत्र दीक्षा तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

महामुनी भगवान श्री कपिलमुनीजी व श्रीगुरु चंद्रेश्वर बाबांच्या कृपाशीर्वादाने, महंत बन्सीपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेने तसेच स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात आले.

पहाटे चंद्रेश्वर महादेवांचा रुद्राभिषेक, श्री चंद्रेश्वर बाबा समाधी पूजन आणि सप्तऋषी समाधी पूजनाने धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. त्यानंतर सकाळी ६ ते १० या वेळेत हजारो भाविकांनी गुरुपूजन करून आशीर्वाद घेतला.

सकाळी झालेल्या आध्यात्मिक प्रवचनानंतर उपस्थित भाविकांना गुरुमंत्र दीक्षा देण्यात आली. दुपारी पाथरशेंबे येथील श्री चंद्रेश्वर सेवा मंडळाच्या वतीने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

या उत्सवासाठी चांदवडसह परिसरातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावत दर्शन, गुरुपूजन आणि धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला. संपूर्ण श्रीक्षेत्र परिसर दिवसभर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.

प्रतिनिधी : संजय जाधव Shreekshetra Chandreshwargad Guru Pournima 2026

हिरे महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन; कला व प्रसारमाध्यमांतून व्यसनमुक्त समाज घडविण्याचे आवाहन

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

One thought on “Shreekshetra Chandreshwargad Guru Pournima 2026 : श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावात संपन्न”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed