MGV Pharmacy College QCI A Grade 2025-2026एमजीव्हीच्या फार्मसी महाविद्यालयाला QCI कडून २०२५-२०२६ साठी प्रतिष्ठेचा 'A' ग्रेड; गुणवत्तापूर्ण शिक्षणाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता.

MGV Pharmacy College QCI A Grade 2025-2026

नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर (एमजीव्ही) संचलित फार्मसी महाविद्यालय (स्वायत्त), हिरे नॉलेज कॅम्पस, पंचवटी, नाशिक याला क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) कडून शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी प्रतिष्ठेचा ‘A’ ग्रेड प्रदान करण्यात आला आहे. या मानांकनामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धती, प्रभावी शैक्षणिक व्यवस्थापन, संशोधन, नवोपक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

या मानांकनासाठी देशभरातील ३९८ महाविद्यालयांनी अर्ज केले होते. त्यामधून विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल एमजीव्हीच्या फार्मसी महाविद्यालयाने सर्वोच्च ‘A’ ग्रेड मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

QCI च्या मूल्यमापन प्रक्रियेत शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासन व्यवस्था, पायाभूत सुविधा, संशोधन व नवोपक्रम, उद्योग-संस्था सहकार्य, विद्यार्थी विकास, गुणवत्ता हमी प्रणाली तसेच संस्थेची एकूण कार्यक्षमता या सर्व बाबींचे सखोल परीक्षण करण्यात आले. या सर्व निकषांमध्ये महाविद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी केली. (MGV Pharmacy College QCI A Grade 2025-2026)

महाविद्यालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा, आधुनिक उपकरणे, समृद्ध डिजिटल ग्रंथालय, संशोधनाला पूरक वातावरण तसेच अद्ययावत संगणक व आयटी सुविधा उपलब्ध आहेत. उद्योगसंलग्न उपक्रम आणि कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगाचा अनुभव मिळत असून त्यांच्या व्यावसायिक कौशल्यांना अधिक धार मिळत आहे.

या यशामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि माजी विद्यार्थी (Alumni) यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने नमूद केले आहे. अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्याधारित शिक्षण, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, संशोधन आणि व्यक्तिमत्त्व विकासावर सातत्याने भर दिला जात असल्याने महाविद्यालयाचा उत्कृष्टतेकडे वाटचाल अधिक भक्कम झाली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे, कोषाध्यक्ष डॉ. स्मिता हिरे, उपाध्यक्ष डॉ. हरीश आडके, सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे, समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त डॉ. संपदा हिरे, डॉ. अद्वय हिरे तसेच महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेश शिंदे यांनी प्राचार्य डॉ. संतोष तांबे, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिनिधी : प्रथमेश महाले MGV Pharmacy College QCI A Grade 2025-2026

 अंबड एमआयडीसीतील जीवघेण्या खड्ड्याचा आणखी एक बळी; व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

2 thoughts on “MGV Pharmacy College QCI A Grade 2025-2026 : एमजीव्हीच्या फार्मसी महाविद्यालयाला क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाकडून प्रतिष्ठेचा ‘A’ ग्रेड”
  1. [3482]bee Official Login | Slots na Madaling Manalo at Mabilis na Payout,Gamitin ang bee official login para sa slots na madaling manalo. I-download ang app at alamin ang mabilis na cash-in gamit ang GCash. Maglaro na ngayon! visit: bee

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed