Congress Dodamarg Meetingदोडामार्ग येथे काँग्रेसच्या संघटनात्मक बैठकीत SIR प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.

Congress Dodamarg Meeting

दोडामार्ग प्रतिनिधी

दोडामार्ग : काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दोडामार्ग तालुक्याचा दौरा करून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी संघटनात्मक बांधणी, आगामी राजकीय घडामोडी तसेच निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.

बैठकीत जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावांत सक्रिय राहण्याचे आवाहन केले. तसेच SIR प्रक्रियेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत करणे, नागरिकांना आवश्यक माहिती देणे आणि पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी काम करण्याच्या सूचना दिल्याचे पक्षाने सांगितले.

दौऱ्यादरम्यान साटेली-भेडशी परिसरातील चोरीच्या घटनेचा यशस्वी छडा लावल्याबद्दल दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खोपडे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. चोरी प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून आरोपींना जेरबंद केल्याबद्दल त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

यावेळी सेवादल जिल्हाध्यक्ष अजिंक्य गावडे, तालुकाध्यक्ष बाबू गवस, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, संतोषकुमार दळवी, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव नाईक, सुभाष दळवी, सुधीर चांदेलकर, सुधीर गवस, श्रीकृष्ण गवस, संदीप नाईक, सोनू गवस, मोहन गवस, बाबाजी सावंत, सुशांत बोंद्रे, दिनानाथ उगवेकर, मदन सावंत, तुकाराम नाईक, विजय हेरेकर, देवानंद हजारे, राजन गावडे, विठ्ठल नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या दौऱ्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.

Congress Dodamarg Meeting

81 तासांनंतर शोधमोहीम संपली; 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह

Avatar photo

By Vishal Bhadane

Vishal Sanjay Bhadane is the Founder and Editor of MHDU News (Mahadut Janbindu), a digital news platform covering Maharashtra news, politics, crime, public issues, government schemes, business and breaking news with a commitment to accurate, timely and responsible journalism.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *